CBSE Paper Controversy : ‘सीबीएसई’चा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांना ‘त्‍या’ प्रश्‍नाचे सर्व गुण मिळणार

CBSE Paper Controversy : ‘सीबीएसई’चा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांना ‘त्‍या’ प्रश्‍नाचे सर्व गुण मिळणार
Published on
Updated on

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

केंद्रीय माध्‍यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) दहावीच्‍या परीक्षेतील आक्षेपार्ह उतार्‍यावरील प्रश्‍नच ( CBSE Paper Controversy ) रद्‍द केला आहे. विद्यार्थ्यांना 'त्‍या' प्रश्‍नाचे सर्व गुण मिळणार असल्‍याची घोषणा 'सीबीएसई' परीक्षा नियंत्रकांनी केली आहे. तज्‍ज्ञांच्‍या शिफारशीनुसार आम्‍ही या प्रश्‍नच रद्‍द करत आहोत. या प्रश्‍नाचे सर्व गुण विद्यार्थ्यांना दिले जातील.

CBSE Paper Controversy : काय आहे प्रकरण?

'सीबीएसई'च्‍या दहावीच्‍या परीक्षेसाठी एक उतारा देण्‍यात आला होता. यामध्‍ये म्‍हटलं आहे की, सामाजिक व कौटुंबिक समस्‍यांमुळेच आज महिलांना मुक्‍त संचार करण्‍याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. घरामध्‍ये पत्‍नी ही पतीचे ऐकत नाही. यामुळेच मुलांनाही शिस्‍त लागत नाही.

आक्षेपार्ह उतार्‍यावर सोनिया गांधींचा लोकसभेत सवाल

याप्रश्‍नी काँग्रसेच्‍या ज्‍येष्‍ठ नेत्‍या सोनिया गांधी यांनी आज लोकसभेत सवाल (Sonia Gandhi in Lok Sabha ) केला. या संदर्भात बोलताना सोनिया गांधी म्‍हणाल्‍या होत्‍या की, सीबीएसई परीक्षेत उतार्‍यावरील प्रश्‍न यामध्‍ये देण्‍यात आलेला उतार्‍यातील मजकूर खूपच आक्षेपार्ह आहे. याचा उतार्‍यातील मजुकारवर जेवढा आक्षेप घेतला जाईल तेवढा कमीच आहे. अशा प्रकारे महिलांविरोधातील मजकूर हा आपल्‍या शिक्षण क्षेत्रातील दर्जा कितपत खालावला आहे, याचेच उदाहारण आहे. सीबीएसईने आक्षेपार्ह मजकुर तत्‍काळ हटवावा. यावर जेवढी टीका करता येईल ती कमीच आहे. याप्रकरणी शिक्षण मंत्रालय आणि 'सीबीएसई'ने माफी मागावी, अशी मागणीही सोनिया गांधी यांनी केली होती.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news