Ritwick Dutta : पर्यावरणवादी ऋत्विक दत्ता विरोधात सीबीआयचा गुन्हा दाखल

Ritwick Dutta : पर्यावरणवादी ऋत्विक दत्ता विरोधात सीबीआयचा गुन्हा दाखल

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पर्यावरणवादी वकील ऋत्विक दत्ता (Ritwick Dutta)  यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. विदेशी फंडातून देशातील विकास कामांना रोखण्याचा प्रयत्न दत्ता यांनी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तपास संस्थेने गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून त्यांच्या विरोधात विदेशी योगदान नियमन कायद्यांन्वे (एफसीआरए) गुन्हा दाखल केला आहे.

दत्ता (Ritwick Dutta)  यांची संघटना 'लाईफ' ने अमेरिकेतील 'अर्थ जस्टिस' नावाच्या एनजीओ कडून निधी मिळवून देशात सुरू असलेल्या कोळसा उत्पादन प्रोजेक्ट्स विरोधात खटला दाखल करीत त्यांना रोखण्याचे षडयंत्र रचले, असा आरोप करण्यात आला आहे. हे एफसीआरए चे उल्लंघन असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ऋत्विक दत्ता अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी आहेत. स्वीडनमधील नोबेल पुरस्काराएवढा मानाचा समजला जाणारा 'राईट लाईव्हहूड अवार्ड' २०२१ चे ते मानकरी आहेत. पर्यावरण सुरक्षेसाठी कायदेशीर लढा देण्यासाठी दत्ता नावाजले आहेत.

२०१३-१४ मध्ये अमेरिकेतील संस्थेकडून दत्ता यांना ४१ लाख रुपयांची मदत मिळाली. यासोबातच २०१६-२१ दरम्यान दत्ता यांच्या संघटनेला विदेशातून २२ कोटींचा निधी मिळाला. 'ईजे' कडून 'लाईफ' संघटनेला मिळालेला निधी कुठल्याही कायदेशीर सल्ल्यासाठी देण्यात आलेली नव्हती, असे तक्रारीतून सांगण्यात आले आहे. या निधीचा वापर करीत देशातील विकास कार्याला रोखण्याचे षडयंत्र रचण्यात आले. हे प्रकरण अशात राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेला धोका तसेच विदेशी निधी कायद्याचे उल्लंघन असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news