पुणे : पुढारी वृत्तसेवा : फिटनेसच्या नावाखाली शुगर फ्री किंवा कृत्रिम गोड पदार्थांचा आजकाल सर्रास वापर केला जातो. मधुमेही रुग्णांच्या आहारातही शुगर फ्रीचा समावेश असतो. मात्र, सातत्याने कृत्रिम गोड पदार्थांचे सेवन केल्याने कॅन्सरचा धोका वाढू शकतो, अशा आशयाचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेकडून नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. दररोजचे पदार्थ, चहा, कॉफीसारखी पेये, डाएट कोक, शुगर फ्री मिठाई, ज्यूस, दही, कोल्ड्रिंक, एनर्जी बार, शुगर फ्री आईस्क्रीम अशा अनेक पदार्थांमध्ये कृत्रिम स्वीटनरचा वापर केलेला असतो. यामध्ये 'एस्पार्टम' नावाचा घटक असतो.