कॅफिनमुळे टाईप 2 डायबिटीजसह लठ्ठपणा कमी होण्‍यास मदत : नवीन संशोधनातील माहिती

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आधुनिक जीवनशैलीत लठ्ठपणा आणि डायबिटीजचा ( मधुमेह) धोका वाढला आहे. मागील काही वर्षांमध्‍ये तरुणाईमध्‍ये डायबिटीज होण्‍याचा प्रमाणात झालेली वाढ हा चिंतेचा विषय ठरला आहे. जगभरात यावर मोठ्या प्रमाणावर संशोधनही होत आहे. आता बीएमजे मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन संशोधनात कॅफिनच्‍या सेवनामुळे टाईप 2 डायबिटीज आणि लठ्ठपणा कमी होण्‍यास मदत होते, असे आढळले आहे. ( Caffeine could reduce obesity, risk of diabetes)  जाणून घेवूया या नवीन संशोधनाविषयी…

Caffeine : असे झाले संशोधन ?

बीएमजे मेडिसिन जर्नलमध्ये दिलेल्‍या नवीन संशोधनातील माहितीनुसार, या संशोधनासाठी मेंडेलियन यादृच्छिकीकरण (MR) नावाचे सांख्‍यिकीय तंत्र वापरले गेले. या तंत्रात संशोधनात सहभागी झालेल्‍यांचे अनुवांशिक विश्‍लेषण केले जाते. संशोधकांनी मुख्यतः युरोपियन वंशाच्या सुमारे दहा हजार लोकांचा अनुवांशिक विश्‍लेषण केले. यामध्‍ये असे दिसून आले की, अनुवांशिकदृष्ट्या अंदाजित रक्तातील कॅफीन पातळी शरीराच्या कमी वजनाशी (BMI) संबंधित आहे. उच्च अनुवांशिक अंदाजानुसार रक्तातील कॅफीन पातळी देखील टाईप 2 डायबिटीजच्या कमी जोखमीशी संबंधित होते. त्‍यामुळे लठ्ठपणा आणि टाईप 2 डायबिटीज धोका कमी करण्यासाठी कॅलरी-मुक्त कॅफिनयुक्त पेयेची संभाव्यता शोधणे फायदेशीर ठरू शकते, असा निष्‍कर्ष संशोधकांनी काढला आहे.

Caffeine शरीरातील चरबी कमी होण्‍यास करते मदत 

कॅफीन सेवनाने शरीरातील चरबी कमी होण्‍यास मदत होते. वजन कमी झाल्यामुळे टाईप 2डायबिटीज तसेच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी होतो, असेही संशोधनात आढळले आहे. या संशोधनात इम्पीरियल कॉलेज लंडन, ब्रिस्टल विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन आणि स्वीडनमधील उपसाला विद्यापीठातील संशोधकांच्या सहकार्याने करण्यात आला.

नवीन संशोधनाला मर्यादा…

संशोधकांनी हे मान्य केले आहे की, कॅफीनवरील या नवीन संशोधनाला मर्यादा आहेत, ज्यामध्ये केवळ दोन अनुवांशिक रूपे वापरणे आणि केवळ युरोपियन वंशाच्या लोकांचा समावेश करणे समाविष्ट आहे. त्‍यामुळे यावर अधिक संशोधनाची गरज आहे. मागील एका संशोधनात असे आढळले होते की, दररोज तीन ते पाच कप कॉफी पिणे टाईप 2 डायबिटीज आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी करते. सरासरी एक कप कॉफीमध्ये सुमारे 70-150 मिलीग्राम कॅफिन असते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news