पुढारी ऑनलाईन डेस्क: आयटीआयमधील (ITI) शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा ५०० रुपये विद्यावेतन मिळणार आहे, अशी घोषणा आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली. कौशल्य विकास योजनेअंतर्गत राज्यातील आयटीआय शिल्प कारागिर विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरीव वाढ करण्यात आली आहे. याबरोबर आणखी काही महत्त्वाचे निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत.
आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विविध निर्णय घेण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.