Helen : नोरा फतेहीच्या आधी जिने बॉलिवूडला थिरकवले होते

nora and helen
nora and helen
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूडमध्ये डान्सिंग क्वीन नोरा फतेहीला तर आपण सर्वच जण ओळखतो. बॅले डान्सर अशी ओळख असलेल्या नोराने आपल्या डान्सच्या तालावर सर्वांनाच नाचवले आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का, नोराच्या आधी कुक्कू मोरे, हेलन (Helen) आणि वैजयंतीमाला या अभिनेत्री, डान्सर्सची नावेही समोर येतात. हेलन (Helen) यांच्या आयटम डान्सने तर सर्वांना डोलायला लावले आहे.
बॉलिवूडमध्ये सर्वात आधी रबर गर्ल म्हणून ओळखली जाणारी कुक्कू मोरे आणि हेलन या डान्सर्सविषयी जाणून घेऊया.

कुक्कु मोरे
कुक्कु मोरे

कुक्कू मोरे

१९२८ मध्ये एका अँग्लो परिवारात कुक्कू मोरेचा जन्म झाला होता. ४० आणि ५० च्या दशकात 'रबर गर्ल' नावाने तिची ओळख झाली. त्या जमान्यात एका गाण्यासाठी ती ६ हजार रुपये घ्यायची. (त्यावेळची ही खूप मोठी रक्कम असायची.) बालपणापासून डान्सची आवड असणाऱ्या कुक्कूने १९४६ मध्ये नानूभाई वकील दिग्दर्शित चित्रपट 'अरब का सितारा' मधून सुरुवात केली. पहिल्याच चित्रपटात तिने इतका चांगला डान्स केला की, तिला अनेक मोठ्या चित्रपटात काम मिळालं.

कुक्कू ही हेलन यांची मैत्रीण होती. ४० ते ५० च्या दशकात कुक्कूमुळे चित्रपटांमध्ये कॅब्रे डान्स असणं गरजेचं बनलं होतं. असं म्हटलं जातं की, कुक्कूने हेलनला डान्स शिकवला होता. हेलनदेखील चांगला डान्स करायची. कुक्कूने हेलनला चित्रपटांमध्ये काम करण्याचा सल्ला दिला. आजदेखील हेलन चित्रपट दुनियेत पाऊल ठेवण्याचं श्रेय कुक्कू मोरेला देते.

हेलन (Helen)

हेलन जॅराग रिचर्डसन हिंदी चित्रपटातील कॅब्रे डान्सर आहे. त्यांनी आपल्या करिअरमध्य़े ५०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बोल्ड आणि सुंदर कॅब्रेट डान्सर असणाऱ्या हेलन यांनी मेरा नाम चिन चिन चू, मेहबूबा मेहबूबा, इस दुनिया में जिना हो तो सुन लो मेरी बात (चित्रपट गुमनाम) यासारखी एनर्जेटिक गाणी लोकप्रिय केली.

हेलन यांचं चित्रपट करिअर

हेलन (Helen) यांना वयाच्या १९ व्या वर्षी बंगाली चित्रपट हावडा ब्रिजमधून करिअरला सुरवात केली होती. ५० च्या दशकात प्रसिध्द डान्सर कुक्कूने हेलन यांना चित्रपटात आणलं. तेव्हा हेलन तेरा वर्षाच्य़ा होत्या.

६० आणि ७० च्या दशकात गायिका आशा भोसले यांनी हेलन यांच्यासाठी गाणी गायली.

ये मेरा दिल

१९७८ मध्ये रिलीज झालेला चित्रपट डॉन मधील ये मेरा दिल गाणे हेलनवर चित्रीत करण्यात आले होते. आशा भोसले यांनी हे गाणे गायले होते. जीनत अमान, अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात आपल्या डान्समधून सुंदर परफॉर्मन्स हेलन यांनी दिला होता.

पिया तू अब तो आजा

१९७१ मध्ये रिलीज झालेला चित्रपट कारवाँमधील पिया तू अब तो आजा हे हेलनचे गाणे प्रचंड लोकप्रिय ठरले. आशा भोसले यांनी गाण्याला स्वरसाज चढवला होता. जितेंद्र आणि आशा पारेख यांच्या य चित्रपटात मुख्य भूमिका होत्या.

कर ले प्यार

तलाश या चित्रपटातील आशा भोसलेंच्या या आवाजातील कर ले प्यार गाण्यावर हेलन यांनी कॅब्रे डान्स केला होता. राजेंद्र कुमार, शर्मिला टागोर यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या. हा पहिला भारतीय चित्रपट होता, ज्याचे बजेट १ कोटी रुपये होते.

मेहबूबा मेहबूबा

आर डी बर्मन यांनी गायलेले मेहबूबा मेहबूबा शोले चित्रपटातील (१९७५) क्लासिक डान्स होता. हेलन यांचे हे सदाबहार गाणे आजही सर्वांच्या तोंडी आहे.

ओ हसीना झुल्फोंवाले जाने जहा

१९६६ मध्ये रिलीज झालेला चित्रपट तिसरी मंझिलमधील ओ हसीना झुल्फोंवाले जाने जहा सुपरहिट गाणे आहे. या गाण्यावर हेलन यांनी आपल्या दमदार डान्सने सर्वांना घायाळ केलं होतं. शम्मी कपूर, आशा पारेख आणि प्रेम चोप्रा यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या.

आज की रात कोई आने को है

हेलन यांनी अनामिका (१९७३) या चित्रपटातून आज की रात कोई आने को हैं या गाण्यावर सुपर डान्स केला होता. जया बच्च्नन आणि संजीव कुमार यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या.

समूह नृत्यामध्ये अनेक डान्सर्संसोबत हेलन यांना डान्स करण्याची संधी मिळाली होती. हेलन यांनी साठच्या दशकातील प्रसिध्द गायिका गीता दत्ताच्या अनेक बहारदार गाण्यांवर परफॉर्मन्स दिला. त्यांच्या कामगिरीसाठी फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट सहाय्यक कलाकाराचे नामांकन गुमनाम या चित्रपटासाठी मिळालं होतं. हेलन यांनी १९८३ नंतर काही चित्रपटांमध्ये कॅमिया रोल केला होता. भारत सरकारने त्यांना २००९ मध्ये पद्मश्री पुरुस्काराने सन्मानित केलं होतं.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news