Glowing Skin : २ मिनिटांत चेहऱ्यावर येईल ग्लो; घरच्याघरी असे बनवा फेस मास्क

Glowing Skin
Glowing Skin

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रत्येकाच्या जीवनात सुंदरतेला अन्यय साधारण महत्व आहे. मुली, महिलासोबत पुरूषांना देखील नेहमी फ्रेश आणि चमकदार दिसावे असे वाटत असते. मात्र, धावपळीच्या जीवनात या गोष्टीकडे दुर्लक्ष होऊन जाते. यामुळे काही वेळा महिलांचा चेहऱ्या काळवंडतो. मात्र, घाबरण्याचे कारण नाही. कारण आता घरच्याघरी २ मिनिटांत चेहऱ्यावर ग्लो येणारा फेसपॅक बनवून चेहऱ्यावर तजेलदारपणा आणता येईल. ( Glowing Skin )

फेस मास्क १

फेस पॅक बनवण्याचे साहित्य

गव्हाचे पीठ : चार चमचा
मेथींचे दाणे : एक चमचा
हळदपूड : एक चमचा
टोमॅटो : एक

फेस पॅक बनवण्याची कृती
१. एक चमचा मेथींचे दाणे पहिल्यांदा एका वाटीत पाणी घालून भिजत ठेवा.
२. भिजलेले मेथींचे दाणे आणि टोमॅटो मिक्सरमध्ये वाटून घ्या. (यातील पाण्याचे प्रमाण तुम्ही कमी- जास्त करू शकता)
३. या मिश्रणात गव्हाचे पीठ, हळद मिसळून पाच मिनिटे बाजूला ठेवा. (हळद नको असेल तर त्याऐवजी मध घालू शकता.)
४. यानंतर हा फेस पॅक चेहऱ्यावर लावण्यास तयार होईल.

फेस पॅक वापरण्याची पद्धत

१. फेस पॅक वापरण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा किंवा टिश्यू पेपरने स्वच्छ करा.
२. यानंतर मग भिजलेले मिश्रण घेवून हलक्या हाताने चेहऱ्यावर लावा. (यासाठी तुम्ही ब्रेसचा वापर करू शकता)
३. चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटे हे मिश्रण असेच लावून ठेवावे.
४. यानंतर चेहऱ्यावरील मास्क सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवा आणि मऊ टॉवेलने हळूवारपणे कोरडा करा.

फेस मास्क २

फेस पॅक बनवण्याचे साहित्य

गव्हाचे पीठ : दोन चमचा
गुलाब पाणी : एक चमचा
मध : दोन चमचा
कच्चे दूध

फेस पॅक बनवण्याची कृती

१. पहिल्यांदा एका वाटीत गव्हाचे पीठ, गुलाब पाणी, मध आणि कच्चे दूध घेऊन ते एकत्रित मिसळावे.
२. एकत्रित फेस पॅक थोडा वेळाने चेहऱ्यावर लावण्यास तयार झाला आहे.

फेस पॅक वापरण्याची पद्धत –

१. फेस पॅक वापरण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा किंवा टिश्यू पेपरने स्वच्छ करा.
२. यानंतर फेस पॅक संपूर्ण चेहरा आणि मानेवर हलक्या हाताने लावा.
३. फेस पॅक लावून १० ते १५ मिनिटे झाल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका आणि मऊ टॉवेलने हळूवारपणे कोरडा करा.
४. हा फेस पॅक आठवड्यातून एकदा तरी वापरल्याने चेहऱ्यावर ग्लो येईल.

या गोष्टी लक्षात ठेवा

१. हा फेस पॅक वापरल्यानंतर चेहऱ्यावर कोणतेही रासायनिक क्रीम लावू नये.
२. चेहऱ्यावरील फेस पॅक काढण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.
३. तसेच पॅक वापरण्यापूर्वी जर चेहऱ्यावर मेकअप केलेला असेल तो अगोदर पाण्याने स्वच्छ करावा.

घरच्याघरी आणि कमीत- कमी पैशांचा वापर करून तयार केलेल्या या फेस पॅकने चेहऱ्यावर ग्लो तर येईल. यासोबत चेहऱ्यावरील काळे डाग आणि सुरकुत्यादेखील कमी होण्यास याचा फायदा होईल. यामुळे धावपळीच्या जीवनात तजेलदार राहण्यास हा सोपा उपाय महिलांसाठी आवश्यक आहे. (Glowing Skin )

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news