Burj Khalifa : ‘बुर्ज खलिफावर’ भारताचा तिरंगा; ‘युएई’त पीएम मोदींचे भव्‍य स्वागत

PM Modi
PM Modi

पुढारी ऑनलाईन: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या संयुक्त अरब अमीरात (युएई) च्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, जगातील सर्वात उंच  इमारत बुर्ज खलिफावर भारताचा तिरंगा प्रदर्शित केला आहे. पीएम मोदी यांच्या स्वागतार्ह दुबईत असलेल्या जगातील सर्वात उंच इमारतीवर भारताचा राष्ट्रीय ध्वज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र देखील प्रदर्शित (Burj Khalifa) केले आहे. अशा अनोख्या पद्धतीने पीएम मोजी यांचे संयुक्त अरब अमिरातीमध्ये भव्‍य स्वागत करण्यात आले आहे.

पंतप्रधान सध्या 'युएई' च्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी पंतप्रधान मोदी यांचे अबुधाबी विमानतळावर आगमन झाले. यानंतर विमानतळावर UAE चे क्राउन प्रिन्स शेख खालेद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी पीएम मोदी यांचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिकृत द्विपक्षीय संबंधावर चर्चा करण्यासाठी अबुधाबी येथे पोहचले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी द्विपक्षीय मुद्द्यांवर राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेणार आहेत.

पीएम मोदी आज SAGAR व्हिजन साकारत आहेत- भारतीय नौदल

पंतप्रधान मोदी हे आज UAE ला भेट देत आहेत, दरम्यान त्यांनी INS त्रिकंद हे पर्शियन आखाती आणि ओमानच्या आखातामध्ये तैनात करण्यात आलेल्या मिशनची पाहणी केली. जे या प्रदेशातील सागरी सुरक्षेला हातभार लावत, व्यापाराची सुरक्षित हालचाल सुनिश्चित करते हे याचे वैशिष्ट्य आहे. यावर पीएम मोदी यांचे SAGAR व्हिजन साकारत आहे, असे भारतीय नौदलाने म्हटले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news