जसप्रीत बुमराहचे पुनरागमन पुन्‍हा लांबणीवर, ‘आयपीएल’ला मुकणार?

जसप्रीत बुमराहचे पुनरागमन पुन्‍हा लांबणीवर, ‘आयपीएल’ला मुकणार?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारताचा 'स्‍टार' गोलंदाज जसप्रीत बुमराह याची दुखापत टीम इंडियासह त्‍याच्‍या चाहत्‍यांसाठी आता चिंतेचा विषय झाला आहे. पाठीला झालेल्‍या दुखापतीमुळे बुमराह मागील अनेक महिने टीम इंडियापासून लांबच आहे. बुमराह आयपीएल २०२३ मध्‍ये पुनरागमन करेल, अशी शक्‍यता व्‍यक्‍त होत होती. मात्र एका रिपोर्टनुसार, बुमराह अद्याप पूर्ण फीट नाही. त्‍यामुळे तो आयपीएल आणि जूनमध्‍ये होणार्‍या कसोटी विश्‍वचषक अंतिम सामन्‍यात खेळण्‍याची शक्‍यता कमी आहे.  ( Bumrah may miss IPL )

बुमराह दुखापतग्रस्‍त झाला. त्‍यामुळे टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेतून तो बाहेर पडला. याचा मोठा फटका टीम इंडियाला बसला. तो लवकरच टीम इंडियात पुनरागमन करेल, अशी शक्‍यता व्‍यक्‍त होत होती. मात्र आता मीडिया रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय ) आणि आयपीएल संबंधित सूत्रांनी संकते दिले आहेत की, मागील पाच महिन्‍यांपासून बुमराह आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटपासून लांब आहे. आताही तो पूर्णपणे फीट नाही. त्‍यामुळे तो लवकर मैदानावर उतरेल याची शक्‍यता नाही. त्‍यामुळे यापुढेही अनेक दिवस तो टीम इंडियापासून तो लांब राहिल, असे मानले जात आहे. ( Bumrah may miss IPL )

वन-डे विश्‍वचषक स्‍पर्धेपूर्वी बुमराह पूर्ण फीट असणे आवश्‍यक

भारतीय क्रिकेट संघ व्‍यवस्‍थापनही बुमराहच्‍या पुनरागमनासाठी घाई करणार नाही. कारण या वर्षी होणार्‍या वनडे विश्‍वचषक स्‍पर्धेसाठी तो पूर्णपणे फीट असणे आवश्‍यक आहे. यावर्षी ऑक्‍टोबर-नोव्‍हेंबर महिन्‍यात भारतातच वनडे विश्‍वचषक स्‍पर्धा होणार आहे. या स्‍पर्धेत बुमराह खेळणे खूप महत्त्‍वाचे आहे. त्‍यामुळे त्‍याला सध्‍या तरी पूर्ण विश्रांतीचा सल्‍ला दिला जात आहे. त्‍यामुळे आता तो थेट आशिया चषक स्‍पर्धेत तो खेळेल, असे आता मानले जात आहे.

बुमराह याने २५ सप्‍टेंबर २०२२ रोजी अखेरचा आंतरराष्‍ट्रीय सामना ऑस्‍ट्रेलिया संघाविरुद्‍ध खेळला होता. यानंतर तो पाठीच्‍या दुखापतीमुळे संघाबाहेर गेला. यानंतर जानेवारी २०२३ मध्‍ये त्‍याचा संघात समावेश करण्‍यात आला. मात्र दुखापतीचा त्रास कायम असल्‍याने कोणताही सामना न खेळता तो पुन्‍हा एकदा संघाबाहेर गेला. यानंतर तो आयपीएल स्‍पर्धेत खेळेल असे मानले जात होते. कारण टी20 सामन्‍यात एका गोलंदाजाला केवळ चार षटके टाकायची असतात. मात्र आता बुमराह आयपीएलमध्‍येही खेळणार नसल्‍याची माहिती समोर येत आहे. तो पूर्णपणे फीट झाल्‍यानंतरच त्‍याला मैदानात उतरविण्‍याचा निर्णय संघ व्‍यवस्‍थापनाने घेतला आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news