Budget News : ‘या’ अर्थमंत्र्यांनी मांडला होता सर्वात कमी शब्दांमध्ये अर्थसंकल्प

Budget News
Budget News

पुढारी ऑनलाईन डेस्क : अर्थसंकल्प म्हटलं की, अर्थमंत्र्यांचे दीर्घकाळ चालणारे भाषण हेच डोळ्यासमोर येते. मात्र एका अर्थसंकल्पावेळी अवघ्या काही मिनिटांमध्येच म्‍हणजे केवळ ८०० शब्दांमध्ये अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. ते वर्ष होते १९७७ आणि सरकार होते मोरारजी देसाई यांचे. प्रदीर्घ काळ असणारा एक अर्थसंकल्प तब्बल १८,६५० शब्दांचा होता. जाणून घेवूया कमी व दीर्घ काळ सादर झालेल्‍या अर्थसंकल्‍पांविषयी….(Budget News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प ((Budget 2023) अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी मांडणार आहे. त्यांचा हा सलग पाचवा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्य जनतेपासून ते विविध क्षेत्रातील लोकांचे लक्ष लागून राहिले आहे. अर्थसंकल्‍पाचे भाषण  सर्वात कमी शब्दाच कोणाचं होते? तर हा विक्रम तत्कालीन अर्थमंत्री हीरुभाई मुलजीभाई पटेल यांच्या नावावर आहे.

फक्त ८०० शब्दाचं अर्थसंकल्पीय भाषण

अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने आतापर्यंच्या अर्थमंत्र्यांवर काही विक्रमांची नोंद आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातील सर्वात कमी शब्दाचं भाषण हे तत्कालीन अर्थमंत्री हीरुभाई मुलजीभाई पटेल यांच्य नावावर आहे. हे भाषण फक्त ८०० शब्दांच होतं. सर्वात कमी शब्दांच हे अर्थसंकल्पीय भाषण तत्कालीन अर्थमंत्री हीरुभाई मुलजीभाई पटेल यांनी १९७७ मध्ये केलं होतं.

Budget News : ११ वे केंद्रीय अर्थमंत्री हिरुभाई पटेल

८०० शब्दांच अर्थसंकल्पीय भाषण करणारे हीरुभाई मुलजीभाई पटेल हे १९७७ मध्ये जनता पक्षाच्या सरकारमधील अर्थमंत्री होते. ते देशाचे ११ वे केंद्रीय अर्थमंत्री होते.  त्यांचा कार्यकाळ २६ मार्च ते १९७७ ते २४ जानेवारी १९७९ असा होता. त्यानंतर त्यांनी देशाचे गृहमंत्री म्हणून पदभार सांभाळला.   मोररजी देसाई पंतप्रधान होते. मोरारजी देसाई भारताचे चौथे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. तत्पूर्वी त्यांनी अर्थमंत्री म्हणून दहावेळा अर्थसंकल्प मांडला होता. सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम यांच्यावर आहे. १९६२ ते १९६९ या काळात १० वेळा त्‍यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. दुसरा क्रमांकावर आहेत पी चिदंबरम आहेत त्यांनी ९ वेळा अर्थसंकल्प मांडला आहे.

हे ठरले सर्वात दीर्घकाळ चालणारे भाषण

आतापर्यंतच्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या इतिहासातील सर्वात कमी शब्दांच भाषण  हिरुभाई पटेल यांनी केले होते तर सर्वात जास्त शब्दांच भाषण कोणाचं असा प्रश्न पडला असेल. तर हा विक्रम आहे भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावावर आहे. मनमोहन सिंग हे मितभाषी म्हणून ओळखले जातात; पण त्यांनी १९९१ मध्ये त्यांनी अर्थमंत्री असताना तब्बल १८,६५० शब्दाचे भाषण केले होते. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या पहिल्या कार्यकाळातील अर्थमंत्री अरुण जेटली. त्यांचे २०१८ मधील भाषण १८,६०४ शब्दांच होतं. या भाषणासाठी १ तास ४८ मिनिटे एवढा कालावधी लागला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news