Budget 2023-24 : पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम ‘जैसे थे’

Budget 2023-24 : पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम ‘जैसे थे’

पुढारी ऑनलाइन डेस्क : यंदाच्या अर्थसंकल्पात पीएम किसान सन्मान निधी योजनेतील (PM Kisan Yojana) हप्त्यांच्‍या रक्कमेत वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. त्‍यामुळे या योजनेत कोणती नवी घोषणा होणार, याकडे देशभरातील शेतकर्‍यांचे लक्ष लागून राहिले होते; पण यंदाच्‍या अर्थसंकल्‍पात ही योजना 'जैसे थे' राहिली आहे.(Budget 2023)

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्‍या माध्‍यमातून दरवर्षी शेतकर्‍यांना ६ हजार रुपये मिळतात. यंदाच्या अर्थसंकल्पात ही रक्कम सहा हजारावरुन आठ हजार रुपये होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती; पण या रक्कमेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

पीएम किसान योजना नोंदणी अशी करा

  •  सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • त्यानंतर  फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करा.
  • फार्मर्स कॉर्नरवर क्लिक केल्यावर 'नवीन शेतकरी नोंदणी' असा पर्याय दिसेल.
  • यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका.
  • त्यानंतर राज्याची निवड करा. त्यानंतर  प्रक्रिया पुढे सुरु होते.
  • त्यानंतर आलेल्या  फॉर्ममध्ये तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरा.
  • बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती भरा
  • यानंतर  फॉर्म सबमिट करा

Budget 2023:  तुमच्या हप्त्याची अपडेट अशी मिळवा

  • प्रथम पीएम  किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट वर जा. ( https://pmkisan.gov.in/ ) जा.
  • बेवसाईटच्या  उजव्या बाजूलाफार्मर्स कॉर्नरचा पर्यायावर क्लिक करा.
  • Farmers Corner वर क्लिक केल्यानंतर Beneficiary Status हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • यानंतर एक नवीन पेज ओपन होईल
  • ओपन झालेल्या पेजवर तुमचा आधार क्रमांक बँक खाते क्रमांक / मोबाइल क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडा.
  • दोन्हीपेैकी एक पर्याय निवडल्यानंतर, Get Data वर क्लिक करा.
  • येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजेल की, आपल्या खात्यामध्ये पैसे आले आहेत की नाही.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news