KCR Health Update | तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर हिप रिप्लेसमेंटची यशस्वी शस्त्रक्रिया

KCR Health Update | तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर हिप रिप्लेसमेंटची यशस्वी शस्त्रक्रिया
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री (former Telangana Chief Minister K Chandrashekhar Rao) आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्यावर हिप रिप्लेसमेंटची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दोन ते तीन दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. केसीआर त्यांच्या फार्महाऊसवर पडले होते. त्यामुळे त्यांना दुखापत झाली होती. (KCR Health Update)

संबंधित बातम्या 

'बीआरएस'ने X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, यशोदा रुग्णालयातील डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केसीआर यांच्यावर हिप बोन रिप्लेसमेंटची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर केसीआर यांना ऑपरेशन थिएटरमधून जनरल रूममध्ये हलवण्यात आले. केसीआरला पूर्णपणे बरे होण्यासाठी आणखी ६ ते ८ आठवडे लागतील, असे डॉक्टरांनी सांगितले.

"तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि बीआरएसचे राष्ट्रीय नेते केसीआर यांच्यावर हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. जवळपास दीड तासांत डॉक्टरांनी अत्यंत गुंतागुतीची शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांच्या अहवालानुसार ही शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वी झाली आहे." असे बीआरएसचे नेते दासोजू श्रवण यांनी म्हटले आहे.

"त्यांना पूर्ण विश्वास आहे की येत्या २ ते ३ दिवसांत त्यांना डिस्चार्ज मिळेल आणि तेलंगणातील ४ कोटी लोकांच्या आशीर्वादामुळे त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. आम्हाला आशा आहे की ६ ते ८ आठवड्यांत आम्ही तेलंगणातील लोकांच्या सेवेत पुन्हा सक्रिय होऊ," असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.

यशोधा रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीआरएस प्रमुख केसीआर यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. केसीआर त्याच्या बाथरूममध्ये पडले आणि डाव्या हिपला फ्रॅक्चर झाले. ज्यामुळे त्यांच्यावर हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. (KCR Health Update)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news