Pune Crime News : बहिणीला त्रास दिल्यामुळे मेव्हण्याने केला दाजीचा गेम; पुण्यातील घटना

file photo
file photo

पुणे : पुण्यात बाणेर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बहीणीला त्रास देत असल्याच्या कारणावरून मेव्हण्याने दाजीच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केला. त्यानंतर मेव्हण्याने देखील आपलं जीवन संपवलं. ही घटना बाणेर येथील हॉटेल मनाली परिसरात उघडकीस आली आहे. मेव्हणा धनंजय पद्माकर गाडेकर (वय. 36) असे खून झालेल्याचे तर हेमंत रत्नाकर काजळे (वय. 40) अशी दोघांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच चतुःश्रृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.

या घटनेची माहिती मिळताच, चतुःश्रृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास करत आहे. मयत धनंजय गाडेकर हा पीजी होस्टेल चालवण्याचा व्यवसाय करत होता. गाडेकर यांच्या बहिणीचे काजळे यांच्यासोबत लग्न झालं. त्यानंतर काजळे हा सतत आपल्या पत्नीला कौटुंबिक कारणावरून वाद करून त्रास देत होता. त्याच वादावरून सोमवारी रात्री दोन्ही नवरा बायकोमध्ये जोरदार भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून गाडेकर याने काजळे याच्या डोक्यात लोखंडी रोड घालून निर्घृण खून केला. त्यानंतर स्वतः आपलं जीवन संपवल्याची माहिती चतुर्शिंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news