Porn Video पाहताना ब्रिटनच्या खासदाराला महिला सहकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले

Porn Video पाहताना ब्रिटनच्या खासदाराला महिला सहकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटनचे लोकप्रिय पंतप्रधान बोरिस जॉन्सन (britain PM boris johnson) यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या (british conservative party) खासदाराला पॉर्न (Porn Video) पाहताना त्यांच्याच दोन महिला खासदारांनी रंगेहाथ पकडले. या खासदाराचे नाव नील पॅरिश (MP Neil Parish) असे आहे. शिवाय या महाशयांनी आपला गुन्हा कबूल करत आपल्या पदाचा राजीनामा दिला.

या घडलेल्या प्रकरणावर बोलताना ब्रिटनचे खासदार नील पॅरीश म्हणाले, मी कबूल करतो की हॉऊस ऑफ कॉमन्समध्ये दोन वेळा पॉर्नोग्राफी (Porn Video) पाहिली आहे आणि या कारणास्तव मी राजीनामा देखिल देत आहे. हा माझा मुर्खपणा होता आणि या गोष्टीचा मला खेद आहे. नील पॅरीश हे ब्रिटनच्या टिवर्टन आणि होनिटोन या मतदारसंघातून निवडून येतात.

महिला खासदारांनी केली होती तक्रार (Porn Video)

खा. नील पॅरीश म्हणाले, एक वेबसाईट पाहताना अचानक माझ्याकडून पॉर्न क्लिक झाले, पण दुसऱ्यांदा मी ही चूक जाणूनबुजून केली. या आरोपांवरून कंझर्व्हेटिव्ह पक्षाने शुक्रवारी त्यांना निलंबित केले. दोन महिला सहकारी खासदारांनी दावा केला की त्यांनी खासदार नील पॅरिश यांना त्यांच्या फोनवर पॉर्न पाहताना पकडले आहे.

कोण आहेत खासदार नील पॅरिश (Porn Video)

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, मी एक वेबसाइट पाहत होतो. यादरम्यान त्याच नावाची एक वेबसाईट आली. त्यानंतर मी काही काळ ही वेबसाइट पाहिली जी मला पहायला नको होते. पुढे ते म्हणाले, पण माझा सर्वात मोठा गुन्हा म्हणजे मी दुसऱ्यांदा त्या वेबसाईटवर गेलो. दुसऱ्यांदा मी ही चूक जाणूनबुजून केली. मी चुकीचे वागलो, मी मूर्ख होतो, मी आता माझे सर्वस्व गमावले आहे.

अशा वर्तनाबद्दल मागितली जाहीर माफी

यावेळी खासदार नील पॅरीश यांनी सर्वांची जाहीररित्या माफी मागीतली आहे. माफी मागण्यापुर्वी त्यांचा राजीनामा देण्याचा व यासंदर्भात माफी मागण्याचा इरादा नव्हता. पण, त्यांच्यावर प्रचंड दबाव वाढल्यानंतर त्यांनी रातोरात आपला निर्णय बदलून सर्वाची माफी मागत राजीनामा दिला. आता त्यांच्या राजीनाम्यानंतर टिवर्टन आणि होनिटोन या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news