Brian Lara : सचिन तेंडुलकरचा खास मित्र बनला वेस्ट इंडिज संघाचा मेंटॉर!

Brian Lara : सचिन तेंडुलकरचा खास मित्र बनला वेस्ट इंडिज संघाचा मेंटॉर!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी विश्वचषक 2023 (ICC ODI World Cup) मधून बाहेर पडल्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ (west indies cricket team) घरच्या मैदानावर भारतीय संघाचा सामना करणार आहे. 12 जुलैपासून दोन्ही संघांमधील दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. या दौऱ्यात उभय संघांमध्ये कसोटीशिवाय तीन एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी-20 मालिकाही खेळवली जाणार आहे. दरम्यान, माजी दिग्गज क्रिकेटर ब्रायन लारा (Brian Lara) वेस्ट इंडिज संघात सामील झाला असून त्याच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

भारताविरुद्धच्या महत्त्वपूर्ण मालिकेपूर्वी वेस्ट इंडिज संघाने (west indies vs india) सचिन तेंडुलकरचा मित्र ब्रायन लारा (Brian Lara) याला संघाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले आहे. लारा हा वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज फलंदाज आहे. त्याची आणि सचिन तेंडुलकरची घट्ट मैत्री आहे. अलीकडेच दोघेही लंडनमध्ये एकत्र फिरताना दिसले होते. वेस्ट इंडिज संघाला नुकताच आयसीसी वर्ल्डकप पात्रता फेरीतून गाशा गुंडाळावा लागला आहे. त्यामुळे हा संघ भारतात होणाऱ्या 2023 च्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. कॅरेबियन संघाने दोन वेळा वनडे वर्ल्डकपचे विजेतेपद पटकावले आहे. गेल्या 48 वर्षांत पहिल्यांदाच त्यांना आयसीसीच्या या स्पर्धेपासून वंचित रहावे लागणार आहे.

लाराच्या विंडिजला संकटातून बाहेर काढणार? (Brian Lara)

लारा हा त्याच्या काळातील महान फलंदाज होता. त्याने वेस्ट इंडिजसाठी 131 कसोटी आणि 299 एकदिवसीय सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये लाराने 52.88 च्या सरासरीने 11953 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 34 शतके आणि 48 अर्धशतकांची नोंद आहे. त्याची कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्या 400 धावा आहे. तर वनडेमध्ये त्याने 40.48 च्या सरासरीने 19 शतके आणि 63 अर्धशतकांच्या जोरावर 10405 धावा केल्या आहेत. एकप्रकारे विंडिज संघाला संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी लाराच्या खांद्यावर असेल. त्याच्या मार्गदर्शनाखाली हा संघ कामगिरीत नक्कीच सुधारणा करेल अशी आशा आहे.

आणखी वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news