का होतो स्तनांचा कर्करोग?, जाणून घ्या निदान आणि उपचार

का होतो स्तनांचा कर्करोग?, जाणून घ्या निदान आणि उपचार

संपूर्ण जगभरात महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. विकसित देशांमधील दर आठ महिलांपैकी एक स्तनांच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. भारतामध्येही या रोगाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. विकसित देशांच्या तुलनेत भारतामध्ये वयाची ५० वर्षे पूर्ण होण्याआधीच महिलांना होणाऱ्या स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. यातही महत्त्वाचे म्हणजे, कर्करोग शरीरात खोलवर पसरलेला असतो त्याचवेळी जवळपास ७० ते ८० टक्के महिला वैद्यकीय उपचारांकडे वळतात. या रोगावरील उपचारांमध्ये होणारी दिरंगाई जीवघेणी ठरू शकते.

का होतो स्तनांचा कर्करोग ?

स्तनांचा कर्करोग झालेल्यांमधील जवळपास पाच ते दहा टक्के महिलांना अनुवांशिक आजार असतो अशा कर्करोगपीडित महिलांच्या कुटुंबातील स्त्रियांमध्ये बीआरसीए-१ आणि बीआरसीए-२ ही गुणसूत्रे असतात. यामुळे स्तनांचा आणि अंडाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता ५५ से ८५ टक्के असते. प्रसिद्ध अभिनेत्री अंजेलिना जोलीने याच कारणामुळे शस्त्रक्रिया करून आपले दोन्ही स्तन काढून टाकले. परंतु ९० ते ९५ टक्के महिलांमध्ये स्तनांचा आणि अंडाशयाचा कर्करोग होण्याचे कोणतेही ठराविक कारण नसते. या कर्करोगापासून बचाव करण्याचा एकच उपाय आहे. तो म्हणजे, आपल्या शरीरात कर्करोगाला पूरक असे बदल झाले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
स्तनांच्या कर्करोगाची सुरुवातीला बाहेरून कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. तरीही, अगदी सुरवातीच्या टप्प्यात कर्करोगाचे अचूक निदान झाले तर त्यावर उपचार करणे सहज सोपे होते. याखेरीजही स्तनांमधील कर्करोग वाढू लागतो, तेव्हा त्याची काही लक्षणे दिसू लागतात. प्रत्येक महिलेने सतर्क राहून त्याकडे लक्ष दिले पाहिजे.

स्तनांच्या कर्करोगाची काही प्रमुख लक्षणे

-स्तनांमधे गाठ
-निपलच्या आकारांत बदल
– निपलमधून रक्त किंवा पाण्यासारखा द्रव वाहणे
– काखेत गाठ होणे.
– बहुतेक महिलांमध्ये कॅन्सरच्या गाठीमुळे स्तनांमध्ये वेदना होत नाही. त्यामुळेच अनेक महिला योग्य वेळी डॉक्टरांकडे जात नाही.

निदान आणि उपचार

वयाच्या तिशी ओलांडल्यानंतर प्रत्येक महिलेने पाळीनंतर आपले स्तन आणि त्याच्या भोवती होणारे बदल यांच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. याचप्रमाणे चाळीशीनंतर वर्षातून एकदा ब्रेस्ट स्पेशालिस्टकडे जाऊन आपली तपासणी करावी. डॉक्टरांच्या सल्ल्याने स्तनांचा एक्स-रे या एक्स-रेला मॅमोग्राम असेही म्हणतात.

मॅमोग्रामच्या मदतीने तांदळाच्या दाण्याइतक्या सूक्ष्म कर्करोगाचाही शोध घेता येतो. अशा स्थितीमध्ये कर्करोगावर उपचार करताना संपूर्ण स्तन काढण्याची गरज नसते. अगदी प्राथमिक अवस्थेत असलेल्या स्तनांच्या कर्करोग पीडितांचा ९० ते ९५ टक्के यशस्वी इलाज होऊ शकतो. स्तनांच्या कर्करोगाचे खूप उशिरा किंवा अगदी अॅडव्हान्स्ड स्टेजमध्ये निदान होते, तेव्हा शस्त्रक्रिया करून संपूर्ण स्तन काढून टाकावा लागतो. इतकेच नाही, तर या अवस्थेत केमोथेरेपीलाही सामोरे जावे लागते, कर्करोग वाढलेल्या अवस्थेत होणाऱ्या उपचारांना २० ते ४० टक्के यश मिळू शकते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news