पुढारी ऑनलाईन ; Brazil Rain : ब्राझीलच्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाउस पडत आहे. हा पाऊस गेल्या अनेक दिवसांपासून कोसळत आहे. या वादळी पावसाचा प्रभाव इतका आहे की, यामुळे देशाच्या अनेक भागात पूर आला आहे. पूर्ण ब्राझीलमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. आतापर्यंत जवळपास ३७ लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक बेपत्ता झाले आहेत. हजारो लोकांना आपली घरे सोडावी लागली आहेत.
ब्राझीलचे Brazil Rain राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी त्यांच्या 'एक्स' वर लिहिले की, 'या पावसामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आमचे सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करेल.' समोर आलेल्या माहितीनुसार मुसळधार पावसाचा फटका बसल्याने जवळपास १०,००० हून अधिक लोकांना आपले घर सोडून जावे लागले आहे. ब्राझीलच्या दक्षिणेकडील प्रदेशात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे अनेक भाग चिखलाने भरले आहेत. यामुळे जनजीवन विस्कळीत बनले आहे.
हेही वाचा :