Brahmastra Trailer : ब्रह्मास्त्रमध्ये शाहरुखचा लूक पाहून चर्चेला उधाण

Brahmastra
Brahmastra

पुढारी ऑनलाईन डेस्क : १५ जूनला ब्रह्मास्त्र चित्रपटाचा (Brahmastra Trailer) ट्रेलर झाल्यानंतर शाहरुखच्या नावाची चर्चा रंगली. हा दिवस चित्रपट चाहत्यांसाठी अतिशय संस्मरणीय ठरला. अखेर प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 'ब्रह्मास्त्र'चा (Brahmastra Trailer) ट्रेलर रिलीज झाला आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. लोकांनी 'ब्रह्मास्त्र'चा ट्रेलर इतका बारकाईने पाहिला की, त्यात त्यांना शाहरुख खानही दिसला. त्य़ामुळे त्याच्या लूकची चर्चा रंगू लागली.

'ब्रह्मास्त्र'मध्ये शाहरुख दिसणार का?

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा जगात काय दर्जा आहे हे सर्वांनाच माहीत आहे. चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून किंग खानच्या पडद्यावर परतण्याची प्रतीक्षा होती, ती देखील लवकरच संपणार आहे. दरम्यान, लोकांनी 'ब्रह्मास्त्र'चा ट्रेलर पाहिला आणि त्यात किंग खानही असल्याचे लक्षात आले. शाहरुख खानने या ट्रेलरवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण शाहरुख खानच्या चाहत्यांनी ट्रेलरचे स्क्रीन शॉट्स काढले आहेत आणि दावा केला आहे की, तो चित्रपटात छोटी भूमिका साकारताना दिसणार आहे.

फोटोंमध्ये शाहरुखची झलक पाहून अनेकांनी आनंदाने उड्या मारल्या आहेत. ट्रेलरमध्ये शाहरुख खान असल्याचे दिसते. बाकी सत्य काय ते चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.

ट्विटरवर नेटकऱ्यांनी ट्विट केलं आहे-

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news