पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकारांना (Pakistani artists) बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. नुकतीच मुंबई न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. त्यामुळे आता सात वर्षांनंतर पाकिस्तानी कलाकारांना बॉलीवूडमधील चित्रपटांसह वेबसीरिजमध्ये काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पाकिस्तानमधील कालाकारांविरोधात दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील बी शुक्रे आणि फिरदोश पी पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या वेळी खंडपीठाने स्पष्ट केले की, सांस्कृतिक सलोखा, एकता आणि शांतता वाढवण्यासाठी हे एक प्रतिगामी पाऊल आहे. कला, संगीत, क्रीडा, संस्कृती आणि नृत्य यासह शांतता, सौहार्द आणि शांततेला प्रोत्साहन देणारे उपक्रम राष्ट्रीय सीमांच्या पलीकडे जातात आणि राष्ट्रांमध्ये आणि देशांमधील एकता आणि सौहार्द वाढवतात." (Pakistani artists)
२०१६ मध्ये उरीमधील दहशतदवादी हल्ला झाला हाेता. यानंतर भारतीय मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन (IMPPA) ने उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याचा ठराव केला होता. पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची भारतातील सिनेकर्मीच्याही मागणी होती. यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. भारतीय कलाकारांनी पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करू नयेत, असे आवाहनही असाेसिएशनच्या वतीने करण्यात आले हाेते. (Pakistani artists)
उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यामुळे आता बॉलीवूडमध्ये माहिरा खान आणि फवाद खानसह पाकिस्तानी कलाकार बाॅलीवूडमधील चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार आहेत. माहिरा खानने राहुल ढोलकिया दिग्दर्शित 'रईस' चित्रपटात शाहरुख खानसोबत काम केले होते. हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. माहिराचा हा पहिलाच हिंदी चित्रपट होता.
हेही वाचा :