Iranian passenger jet | इराणच्या विमानात बॉम्ब, दिल्लीत उतरवणार होते, पण….

Iranian passenger jet | इराणच्या विमानात बॉम्ब, दिल्लीत उतरवणार होते, पण….
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी डेस्क; चीनच्या दिशेने जाणाऱ्या इराणी पॅसेंजर जेट विमानात (Iranian passenger jet) बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर खळबळ उडाली होती. हे विमान भारतीय हवाई हद्दीत असताना विमानात बॉम्ब असल्याची माहिती दिल्ली वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानंतर सदर विमानाचे दिल्लीत उतरण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. पण दिल्लीत हे विमान उतरवण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर हे विमान चीनच्या दिशेने रवाना झाले.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, इराणमधील तेहरान हून चीनमधील ग्वांगझूच्या दिशेने इराणी पॅसेंजर जेट विमान प्रवास करत होते. या दरम्यान तेहरानमधील महान एअरलाइन्सला सदर विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर महान एअरने दिल्ली विमानतळावरील हवाई वाहतूक कक्षाशी संपर्क साधून विमान तातडीने दिल्लीत उतरवण्याची परवानगी मागितली होती. दिल्ली एटीसीने विमानाला जयपूरला जाण्याची सूचना केली. पण विमानाच्या पायलटने नकार दिला आणि त्यांनी भारतीय हवाई हद्द सोडली.

परदेशी विमानाने भारतीय हद्दीत प्रवेश केल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या Su-30MKI लढाऊ विमानांना अलर्ट करण्यात आले. त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, असे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.

हे विमान चीनच्या दिशेने जात असताना त्यावर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी बारकाईने नजर ठेवली. बॉम्बच्या धमकीचे स्वरूप अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, Filghtradar24 कडील डेटावरून असे दिसून आले आहे की विमानाने भारतीय हवाई हद्दीतून बाहेर पडण्यापूर्वी थोड्या वेळासाठी दिल्ली-जयपूर हवाई क्षेत्रातून कमी उंचीवरुन उड्डाण केले. (Iranian passenger jet)

विमानाला जयपूर आणि नंतर चंदीगड येथे उतरण्याचा पर्याय देण्यात आला. पण पायलटने यापैकी कोणत्याही ठिकाणी विमान वळवण्याची इच्छा नसल्याचे जाहीर केले. थोड्या वेळाने तेहरानकडून बॉम्बच्या भीतीकडे दुर्लक्ष करण्याची सूचना मिळाली. त्यानंतर विमानाचा प्रवास चीनच्या दिशेने चालू राहिला, अशी माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news