India’s Best Dancer ३ मधून मलायकाची सुट्टी? सोनालीची वर्णी लागणार

मलायका अरोरा
मलायका अरोरा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा छोट्या पडद्यावरील 'इंडियाज बेस्ट डान्सर ३' ( India's Best Dancer ३) या रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून चर्चेत आहे. या शोमध्ये मलायका परीक्षक म्हणून काम पाहणार आहे. दरम्यान शोच्या एका नवीन प्रोमोनुसार यात मलायका दिसत नाही. त्यामुळे चाहत्यांनी शोमधून मलायकाची सुट्टी झाली का, असे अनेक तर्क- वितर्क लढवले आहेत. तिच्या जागी नव्या अभिनेत्रींची वर्णी लागली असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे मलायका आणि तिच्या टिमकडून याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

याआधी 'इंडियाज बेस्ट डान्सर' शोमध्ये परीक्षकाच्या खुर्चीवर मलायका कोरिओग्राफर गीता कपूर आणि टेरेंस लुईस यांच्यासोबत दिसली होती. परंतु, या शोच्या नवीन प्रोमोमध्ये गीता कपूर आणि टेरेंस लुईस याच्यासोबत मलायका नाही बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे दिसत आहे. सोनालीला खुर्चीवर पाहून अनेकजण आनंदित आहेत. तर काहीजण 'मलायका कोठे आहे?' असा प्रश्न विचारत आहेत.

नेटकरी काय म्हणताहेत?

दरम्यान नेटकऱ्यांनी 'मलायकाची शोमधून सुट्टी झाली असून सोनाली बेंद्रेची वर्णी लागली आहे'., 'मलायका या शोत का नाही?', 'नविन प्राजेक्टमध्ये बिझी झाली आहे काय?',' या शोत मलायका दिसणार नाही का?' यासारखे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. परंतु, मलायका किंवा तिच्या टिमकडून याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याआधी निर्मात्यांनी शोच्या ऑडिशनची घोषणा करत प्रोमो शेअर केला होता. त्या प्रोमोमध्ये मलायका अरोरा होती, परंतु आता ती शोमधून दिसत नाही.

सोनाली बेंद्रे 'सरफरोश', 'दिलजले', 'हम साथ- साथ हैं', 'कल हो ना हो' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. सोनालीला २०१८ मध्ये कॅन्सरचे निदान झाले. यानंतर तिच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार करण्यात आले. केमोथेरपीनंतर सोनालीने कॅन्सरवर मात केली होती.(India's Best Dancer ३ )

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news