Alia Bhatt Pregnancy : आलिया- रणबीर नव्‍या पाहुण्‍याच्‍या स्‍वागतासाठी सज्‍ज, प्रसूतीसाठी रुग्‍णालयात नाेंदणी

Alia Bhatt Pregnancy : आलिया- रणबीर नव्‍या पाहुण्‍याच्‍या स्‍वागतासाठी सज्‍ज, प्रसूतीसाठी रुग्‍णालयात नाेंदणी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर पहिल्यांदा आई-बाबा होणार आहेत. आलियाचा गेल्या काही दिवसांपूर्वी बेबी शॉवर (डोहाळे जेवण) आणि ओटी भरणीचा कार्यक्रम पाडला होता. यानंतर आलियाच्या प्रसूतीची (प्रेंग्नेसी) तारीख जवळ ( Alia Bhatt Pregnancy ) आल्याचे निदर्शनास आलं आहे. दरम्यान, सध्या आलियाचे मुंबईच्या एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये नाव नोंदणी करण्यात आली आहे. आलियाची डिलिव्हरी आणि तिच्या पहिल्या बाळाची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यात म्हणजे २० नोव्हेंबर २०२२ रोजी आलिया तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार असल्याची शक्यता आहे. सध्या मुंबईच्या एच. एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये तिची प्रसूती पूर्वीची नाव नोंदवल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आलियाच्या डिलीव्हरी आणि पहिले अपत्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. ( Alia Bhatt Pregnancy )

परंतु, ज्या हॉस्पिटलमध्ये आलियाची नाव नोंदणी झाली आहे त्याच हॉस्पीटलमध्ये रणबीर कपूरचे वडील आणि आलियाचे सासरे ऋषी कपूर यांना दाखल करण्यात आले होते. याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. यामुळे आलियादेखील तेथेच तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार असल्याचे बोलले जात आहे. यावरून चाहत्यांनी अनेक तर्कवितर्क लावले आहेत.

याआधी आलियाचे डोहाळे जेवण आणि बेबी शॉवर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला होता. यावेळच्या काही फोटो सोशल मीडियावर शेअर करून आलियाने चाहत्यांना ही गुडन्यूज दिली होती. रणबीर आणि आलिया १४ एप्रिल २०२२ रोजी लग्न बंधनात अडकले. मुंबई येथील रणबीरच्या घरी काही मोजक्यात पाहूण्याच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला होता.

आलियाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती नुकतेच अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात मुख्य भुमिकेत दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४५० कोटींचा व्‍यवसाय केला हाेता.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news