Akshay Kumar : कपाळावर चंदन, गळ्यात माळ घालून अक्षय जागेश्वर-बद्रीनाथ धामला

Akshay Kumar
Akshay Kumar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री अक्षय कुमार ( Akshay Kumar ) सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी उत्तराखंडमध्ये बिझी आहे. दरम्यान अक्षयने त्याच्या बिझी शूटिंगमधून वेळ काढून देवभूमी उत्तराखंडमधील अनेक प्रसिद्ध आणि जुन्या मंदिरांना भेटी दिल्या आहेत. यात अल्मोडा येथील प्रसिद्ध जागेश्वर धाम आणि बद्री विशाल येथे जावून देवाचे दर्शन घेतले आहेत. तर बद्रीनाथला येथील भगवान भोलेनाथाच्या चरणी लीन झाला.

अक्षय कुमारने ( Akshay Kumar )  त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करून देवभूमी उत्तराखंडमधील देवाचे दर्शन घेतल्याची माहिती दिली आहे. या फोटोत अक्षय ब्लॅक रंगाच्या शर्टमध्ये आणि कपाळावर चंदन, गळ्यात माळ घालून दिसत आहे. याशिवाय आजूबाजूला चाहत्यांची गर्दी आणि कडक पोलिस बंदोबस्त दिसत आहे. यावरून अक्षयने जागेश्वर धाम येथील मंदिराला भेट देवून दर्शन घेतल्याचे समजते आहे. अक्षयने या फोटोच्या कॅप्शन लिहिले आहे की, 'जगेश्वर धाम. निर्मळ, शांत आणि आनंदी.' अक्षयचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव करत कॉमेन्टस केल्या आहेत.

याआधी अक्षयने एक व्हिडिओ शेअर केला होता. यात पहिल्यांदा उत्तराखंड पर्वत दिसत असून तो विमानातून शूट करताना दिसला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, 'देवभूमी उत्तराखंडमध्ये शूटिंग करण्याचा बहुमान मिळाला! माझ्या मार्गावर श्री. बद्रीनाथ धाम आहे. अक्षरशः अदभूत त्यासाठी शब्दच नाही. जय बद्री विशाल.'

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अक्षय 'कॅप्सूल गिल', 'ओएमजी २', 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'गुरखा' आणि 'सोरारई पोटरू 'च्या हिंदी चित्रपटात दिसला आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news