Ponniyin Selvan २: ऐश्वर्याचा ‘पोन्नियिन सेल्वन २’ आता ओटीटी करणार धमाल?

Ponniyin Selvan २
Ponniyin Selvan २
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा 'पोन्नियिन सेल्वन २' ( Ponniyin Selvan २ ) हा चित्रपट रिलीज होताच चाहत्यांच्या पसंतीस उतरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा टप्पा ओलांडला असून सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाला टक्कर दिली. 'पोन्नियिन सेल्वन २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॉटफार्मवर रिलीज होण्यास सज्ज झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता विक्रम यांचा 'पोन्नियिन सेल्वन २' ( Ponniyin Selvan २ ) हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २८ जून २०२३ रोजी ओटीटी अ‍ॅमेझॉन प्राईमवर चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. मात्र, 'पीएस २' याच दिवशी नक्की अ‍ॅमेझॉन प्राईमवर येणार आहे की नाही? याबाबतची अधिकृत माहिती निर्मात्यांनी किंवा टिममधील कोणीही दिलेली नाही.

'पोन्नियिन सेल्वन २' हा चित्रपट रिलीज होताच चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ३०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ऐश्वर्याने चित्रपटात 'नंदिनी' ची मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपटातील तिच्या जबरदस्त अभिनयाचे सर्व स्तरातून कौतुक झाले. ऐश्वर्यासोबत चित्रपटात अभिनेता चियान विक्रमने भूमिका साकारली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news