पुढारी ऑलानईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा ख्रिसमसच्या मुहूर्तावर काल म्हणजे, २१ डिसेंबर रोजी 'डंकी' चित्रपट चाहत्यांच्या भेटीस आला. शाहरूखचा हा चित्रपट रिलीज होताच चाहत्यांनी थिअटरच्या बाहेर फटाक्याची आतषबाजी केली. काल सकाळपासून चित्रपट गृहात चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान चित्रपटाला चाहत्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता 'डंकी'च्या पहिल्या दिवसांच्या (ओपनिंग डे) कमाईचे आकडे समोर आले आहेत. या आकड्यावरून शाहरूखच्या 'जवान' आणि 'पठाण' याच्या पहिल्या दिवसांच्या कमाईच्या तुलनेत फारच आहे. मात्र, चित्रपटाला विकेंडचा फायदा झाल्यास ही आकडेवारी वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. ( Dunki Box Office Collection )
संबंधित बातम्या
मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा 'डंकी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने रिलीज होण्या आधीपासून अॅडव्हान्स बिकिंगमधून १५ कोटी रूपयांचे कलेक्शन केलं आहे. तर माहितीनुसार, ओपनिंग डेला म्हणजे, पहिल्या दिवशी डंकी चित्रपटाने ३५.२३ कोटींची भरघोस अशी कमाई केली. दरम्यान चित्रपटाची अंदाजे ३० ते ३५ कोटींची कमाई झाली आहे. 'पठाण' आणि 'जवान' नंतर शाहरुखचा 'डंकी' हा तिसरा बिग बजेट चित्रपट आहे.
डंकी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३० ते ३५ कोटींची कमाई केली आहे. ही कमाई शाहरूखच्या 'जवान' आणि 'पठाण' चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईच्या तुलनेत फारच कमी आहे. मात्र, विकेंडचा म्हणजे शनिवार आणि रविवारचा चित्रपटाला फायदा होवून कमाईचे आकडे वाढण्याची शक्यता निर्मात्यांनी वर्तविली आहे. बॉक्स ऑफिसवर 'पठाण'ने पहिल्या दिवशी ७० कोटी रुपये, तर 'जवान' ने ५३ कोटी रुपये कमावले होते. तर दुसरीकडे 'डंकी'च्या आकडेवारीवरून 'चेन्नई एक्सप्रेस' चित्रपटाशी बरोबरी केली आहे.
'डंकी' चे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'पीके' आणि '३ इडियट्स' यासारखे ब्लॉकबस्टर चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जाते. अभिनेता शाहरुख खानसोबत चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी, सतीश शाह आणि विक्रम कोचर यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपटाचे बजेट १२० कोटी रूपये आहे. ( Dunki Box Office Collection )