पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रजनीकांत जेलर चित्रपटानंतर आणखी एक धमाका घेवून आला आहे. चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवत नुकतेच त्याच्या आगामी 'लाल सलाम' ( Lal Salaam ) चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
संबधित बातम्या
निर्मात्यांनी सोशल मीडियावरील एक्स (ट्विटर) वर आगामी 'लाल सलाम' ( Lal Salaam ) चित्रपटाची रिलीज डेटची घोषणा केली आहे. यात त्यांनी २०२ रोजी पोंगलच्या शुभ मुहूर्तावर हा चित्रपट रुपेरी पडद्यावर येणार असल्याचे म्हटलं आहे. मात्र, नेमका कोणत्या दिवशी हा चित्रपट स्क्रिनवर येणार असल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हा चित्रपट रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिने दिग्दर्शित केला आहे. सोशल मीडियावरील लायका प्रॉडक्शनने लिहिले आहे की, "लाल सलाम पोंगल २०२४ ला स्क्रीनवर रिलीज होईल." असे लिहिले आहे.
आगामी 'लाल सलाम' हा तमिळ स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ऐश्वर्या रजनीकांत यांनी केलं आहे. लायका प्रॉडक्शनच्या सुबास्करन अल्लीराजा यांनी निर्मिती केली आहे. अभिनेता विष्णू विशाल आणि विक्रांत या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यामध्ये रजनीकांत एका खास कॅमिओमध्ये दिसणार आहेत. चित्रपटाचे संगीत ए. आर. रहमान यांनी दिले आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, रजनीकांत लोकेश कनगराजच्या चित्रपटात काम करत असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा :