पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉबी देओलचा आज शनिवार, २७ जानेवारी रोजी ५५ वा वाढदिवस आहे. या खास औचित्याने त्याच्या आगामी चित्रपटातील खतरनाक लूक समोर आला आहे. (Kanguva Movie) कांगुवा असे त्याच्या नव्या चित्रपटाचे नाव आहे. कांगुवातील लक्षवेधी लूक निर्मात्यांनी शेअर केला असून अभिनेत्यानेही फर्स्ट लुक पोस्टर शेअर केला आहे. (Kanguva Movie)
संबंधित बातम्या –
पोस्टरमध्ये बॉबी देओलचा क्रूर आणि खतरनाक लूक दिसत असून. यामध्ये उधीरन नेमका कोण आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. आता यावरून पडदा हटवण्यात आला आहे. बॉबी देओल 'ॲनिमल' नंतर पुन्हा एकदा 'कांगुवा'मध्ये विलेनच्या भूमिकेत धुमाकूळ घालायला तयार आहे.
'कांगुवा' मध्ये उधीरन कोण आहे, त्याचे रहस्य उलगडले आहे. बॉबी देओलच्या ५५ व्या वाढदिनी निर्मात्यांनी अखेर खुलासा केला आहे की, बॉबी देओल 'शक्तिशाली' उधीरनची भूमिका साकारणार आहे. त्यांनी या चित्रपटातील फर्स्ट लुक पोस्टर देखील शेअर केला आहे.
बॉबीने पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'निर्दयी, ताकतवर, अविस्मरणीय.' पोस्टरमध्य़े बॉबी गर्दीने घेरलेला दिसत आहे. शरिरावर रक्त असून विस्कटलेले केस आणि हाडांनी बनलेले दागिने घातलेला दिसत आहे.
चित्रपटामध्ये सूर्या, बॉबी देओल आणि दिशा पटानी, जगपति बाबू , योगी बाबू, रेडिन किंग्सले, केएस रविकुमार, अन्य कलाकार देखील प्रमुख भूमिकेत आहे. बॉबी देओल आणि दिशा पटानी 'कांगुवा'मधून तमिळ डेब्यू करत आहे.