Blood Painting : विश्वविक्रमासाठी तो स्वतःच्या रक्ताने रेखाटतोय चित्रकृती

blood Painting
blood Painting

मनिला : कोणतेही चित्र हुबेहूब रेखाटणे ही कला आहे. जगात अनेक प्रतिभावंत चित्रकारांच्या कलाकृती अमर झाल्या आहेत. फिलिपाईन्समधील हा चित्रकार अवलियाच म्हटला पाहिजे. त्याचे नाव आहे एलिटो सर्का. तो चित्रकृती साकारण्यासाठी रंगांची उधळण करत नाही; तर स्वतःच्या रक्ताचा (blood Painting) वापर रंग म्हणून करतो. गेल्या अनेक दिवसांपासून तो चित्रे रेखाटण्याचे काम करत आहे.

काही दिवसांपूर्वी तो यात रममाण असताना जखमी झाला आणि जखमेतून रक्त (blood Painting) वाहू लागले. त्याचवेळी त्याला एक भन्नाट कल्पना सुचली. त्याने त्या रक्तातच ब्रश बुडवला आणि त्याद्वारे चित्र रेखाटायला सुरुवात केली. मात्र, या विचित्र प्रकारामुळे त्याच्यावर टीकादेखील होऊ लागली. त्याने त्याचीही तमा बाळगली नाही. नंतर तर तो दररोज स्वतःचे काही रक्त काढून फ्रीजमध्ये साठवून ठेवू लागला.

आता त्याला विश्वविक्रम करण्याचे वेध लागले आहेत. म्हणजेच शंभर मीटरच्या कॅनव्हासवर तो भलेमोठे चित्र (blood Painting) काढणार असून, त्याद्वारे विश्वविक्रम नोंदवण्याचा त्याचा मानस आहे. काहीही झाले तरी आपले नाव 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंदले जावे, या कल्पनेने तो झपाटला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news