इंदापूर : पुढारी वृत्तसेवा; महाविकास आघाडी सरकारच्या वीज तोडणी मोहीमेच्या निषेधार्थ पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गांवर मंगळवारी (दि. ८) भाजपचा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको सुरु आहे. भाजपाचे शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी राष्ट्रीय महामार्गांच्या रस्त्यावर बसले आहेत. महामार्गांच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
दरम्यान आंदोलनस्थळी राज्य साखर संघांचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, ॲड. कृष्णाजी यादव, भरत शहा, देवराज जाधव, करणसिंह घोलप, विलास वाघमोडे, मयुरसिंह पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार, बाबा महाराज खारतोडे, लालासाहेब पवार यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. तहसीलदार श्रीकांत पाटील, महावितरणचे अभियंता रघुनाथ गोफणे यांच्यासह सर्व
अधिकारी यावेळी उपस्थित आहेत.
हेही वाचलंत का?