पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवले आहे. मात्र मागील सहा दिवसांपासून मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत खल सुरु आहे. पक्ष निरीक्षकांच्या नियुक्तीनंतर हा पेच अधिकच वाढण्याची चर्चा आहे. दरम्यान, छत्तीसगड भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक उद्या 10 डिसेंबर रोजी होणार असून, यामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामार्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ( Chhattisgarh new chief minister )
छत्तीसगडचा मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड होणार या प्रश्नाला उत्तर देताना छत्तीसगड भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरुण साओ म्हणाले की, ' भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक रविवार, १० डिसेंबर रोजी होणार आहे. अर्जुन मुंडा, सर्बानंद सोनोवाल आणि दुष्यंत गौतम हे आमदारांची बैठक घेणार आहेत.
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अर्जुन मुंडा हे छत्तीसगडसाठी भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांपैकी एक आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नावाची लवकरच घोषणा केली जाईल. असेही साओ यांनी स्पष्ट केले.
छत्तीसगड मुख्यमंत्रीपदाच्या शर्थतीमध्ये रेणुका सिंह, लता उसेंडी, गोमती साई या तीन नावांची चर्चा सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष अरुण साव हेही शर्यतीत आहेत. रमण सिंग आणि ओपी चौधरी हेही दावेदार आहेत.
हेही वाचा :