मुंबई महापालिकेवर भाजप-शिंदे गट एकत्र निवडणूक लढवून भगवा फडकवणार : देवेंद्र फडणवीस

मुंबई महानगरपालिका
मुंबई महानगरपालिका

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : मुंबई महापालिका निवडणूक ही निवडणुकी पुरती मर्यादित नाही. आपण केवळ मुंबई महापालिकाच नव्हे तर कुठलीही निवडणूक ही शेवटची निवडणूक आहे, असे समजून  झोकून देतो त्‍याच वेळी निवडणूक जिंकता येते. केवळ एकट्या मुंबई महापालिका निवडणुकीबद्दल आपण प्रयत्‍न करत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रयत्‍न सुरू आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात माध्यमांशी बोलताना म्‍हणाले.

मनसे आणि शिंदे गट मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढवणार आहे, अशी चर्चा आहे. यावर ते म्‍हणाले, पतंगबाजी पाहातो तेव्हा मला देखील खूप मजा येते. असे म्‍हणत त्‍यांनी खिल्ली उडवली. ज्याला जे मनात येईल ते दाखवले जाते. ज्याला जसा वाटतो तसा अर्थ काढला जातो. तुम्ही बघत राहा भाजप व ओरिजिनल शिवसेना म्हणजे शिंदे गट एकत्र निवडणूक लढवून मुंबई महापालिकेवर भगवाच फडकेल असा विश्वास व्यक्त केला.

भाजपाचे मिशन इंडिया तसेच मिशन महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात बारामती येते त्यामुळे मिशन बारामती आहे. परंतु भाजपसाठी प्रत्येक जागा ही महत्वाचीच आहे. तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष बारामतीत मुक्काम ठोकून आहेत, असे फडणवीस म्हणाले.

मंत्रालयात महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांची छायाचित्रे अनिवार्य करण्याचा शासनाकडून आदेश काढण्यात आला. परंतु ते अनिवार्य करण्याची गरज नाही. कारण महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले हे प्रत्येकाच्या मनात आहे. तथापि सरकारी कार्यालये नियमाने व आदेशाने चालतात. त्यामुळे अशा प्रकारचे आदेश काढले जातात. मात्र महाराष्ट्रच नव्हे तर देशात महात्मा फुले व सावित्रीबाई फुलेंचा मान मोठा आहे, असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news