Twitter hacked : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे ट्विटर खाते हॅक

Twitter hacked : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे ट्विटर खाते हॅक

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अधिकृत ट्विटर अकाऊंट काही दिवसांपूर्वीच हॅक करण्यात आलं होतं. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून सोशल मीडियामधून त्याची माहिती देण्यात आली. त्याचा स्क्रिनशाॅटही व्हायरल होत होता. आता भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे अधिकृत ट्विटर अकाऊंट हॅक (Twitter hacked) झाले असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेकडून सांगण्यात आलं आहे.

जे. पी. नड्डा यांचं ट्विटर अकाऊंट हॅक (Twitter hacked) करणाऱ्या हॅकर्सने रविवारी एक ट्विट करताना लिहिलं आहे की, "साॅरी, माझं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. इथं रशियाला दान करा. कारण त्यांना मदतीची गरज आहे." हॅकर्सने नंतर प्रोफाईलचं नाव बदलून ICG OWNS INDIA असं केलं आहे. परंतु, हे ट्विट काढून टाकलेलं आहे.

अकाऊंट हॅक झाल्याची सूचना मिळताच एक टीम जे. पी. नड्डा यांचं अकाऊंट रिकव्हर करण्याच्या कामाला लागली आहे. अर्ध्या तासातच हे ट्विटर अकाऊंट रिकव्हर करण्यात आलं आहे. हॅकरद्वारे करण्यात आलेलं वादग्रस्त ट्विट डिलीट करण्यात आलं आहे. अकाऊंट कसं हॅक करण्यात आलं, याची चौकशी सुरू आहे.

जे. पी. नड्डा यांनी सकाळी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ट्विट केले होते. 'पाचव्या टप्प्यात ६१ जागांवर मतदान होत असून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा. राज्यात एक सशक्त सरकार देण्यासाठी आपली भागीदारी द्या. पहिल्यांदा मतदान करीत असलेल्यांनी लोकशाही मजबूत करण्यासाठी अवश्य पुढे यावे' असे नड्डा यांनी म्हटले होते. हे ट्विट केल्याच्या काही वेळातच नड्डा यांचे ट्विटर खाते हॅक करण्यात आले होते.

हे वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news