धक्कादायक! दिव्यांग मुलीला आठ वर्षे घरात डांबले, जिभेने फरशी साफ करायला लावली, दातही तोडले

धक्कादायक! दिव्यांग मुलीला आठ वर्षे घरात डांबले, जिभेने फरशी साफ करायला लावली, दातही तोडले

रांची : पुढारी वृत्तसेवा; रांची येथे निवृत्त अधिकार्‍याच्या पत्नीने आदिवासी दिव्यांग मुलीला आठ वर्षे घरात डांबून ठेवून भयंकर छळ केल्याची घटना समोर आली आहे. रॉडने मारून तिचे दात तोडले. कधी कधी गरम तव्याचे चटके देण्यात आले. मुलीच्या चेहर्‍यावर अजूनही जखमा आहेत.

महेश्‍वर आणि सीमा पात्रा दाम्पत्य रांचीतील अशोकनगरमध्ये राहते. पीडित मुलगी सुनीता ही गुमला येथील रहिवासी आहे. पात्रा दाम्पत्याला दोन मुले आहेत. मुलीला दिल्लीत नोकरी लागल्यावर सुनीता 10 वर्षांपूर्वी घरकामासाठी दिल्लीला गेली. सहा वर्षांपूर्वी रांचीला परतली. तिला काम सोडायचे होते. पण तिला आठ वर्षे डांबून ठेवण्यात आले. अखेरच्या दिवसांत सुनीताला चालता येत नव्हते. आजारी असताना लघवी झाल्यानंतर पात्रा दाम्पत्याने सुनीताला जिभेने फरशी साफ करायला भाग पाडल्याचेही समोर आले आहे.

विवेक आनंद बस्के नावाच्या एका शासकीय कर्मचार्‍याला सुनीताने या अत्याचाराची माहिती दिली. त्यावरून आरगोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. रांची पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकाने या 29 वर्षीय तरुणीची सुटका केली. सीमा या 'बेटी बचाओ – बेटी पढाओ' अभियानाच्या राज्य समन्वयक होत्या, हे विशेष! भाजपमध्ये पदाधिकारीही होत्या. प्रकरण समोर आल्यानंतर सीमा पात्रा यांची भाजपने हकालपट्टी केली आहे. पात्रा दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news