बंगालमधील तरुणीच्या हत्येवरून भाजपचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल

बंगालमधील तरुणीच्या हत्येवरून भाजपचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पश्चिम बंगालमधील २४ परगणा जिल्ह्यात तरुणीच्या हत्येवरून भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीला लक्ष्य केले आहेमहिलांविरुद्ध पश्चिम बंगालमध्ये गुन्ह्यांची मालिका सुरू आहेममता बॅनर्जींनी बंगालला कन्यांवर अन्याय करणारे राज्य बनविले आहेया संपूर्ण घटनाक्रमावर इंडिया आघाडीचे म्हणणे काय आहेअसा सवाल भाजप नेत्या आणि परराष्ट्र राज्यमंत्री मिनाक्षी लेखी (Meenakshi Lekhi) यांनी केला.

बंगालच्या २४ परगणा जिल्ह्यात हात बांधून आणि गळा चिरलेल्या अवस्थेतील तरुणीचे शव आढळल्याचा व्हिडीओ भाजपच्या आयटी विभागाचे प्रभारी आणि पश्चिम बंगालचे सहप्रभारी अमित मालविय यांनी सोशल मिडियावरून प्रसारित केला होतातसेचपश्चिम बंगालमधील महिलांच्या संरक्षणात अपयशी ठरलेल्या ममता बॅनर्जींना राहुल गांधी प्रश्न विचारणार कायअसा सवाल अमित मालवीय यांनी केलायानंतर भाजप दिल्लीतील नेत्या व परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मिनाक्षी लेखी यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि इंडिया आघाडीवर टीकास्त्र सोडले. (Meenakshi Lekhi)

मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, २४ परगणा येथे आढळलेला महिलेचा मृतदेहपश्चिम बंगालमध्ये महिलांविरुद्धचे अपराध सातत्याने कसे वाढत आहेत, याची आठवण करून देणारा आहे. (मामाटी मानूष (आईमाती आणि माणूसअशी घोषणा देणाऱ्या ममता बॅनर्जींनी राज्याला बॉम्बगोळ्या आणि महिलांवरील अत्याचाराचे केंद्र बनविले आहेयावर इंडिया आघाडीचे लोक काहीही बोलत नाहीअसा प्रहार देखील मिनाक्षी लेखी यांनी केलाप्रशासनाला कर्तव्य बजावण्यासाठी सांगण्याऐवजी लोकांना दोष देणारा मुख्यमंत्री मिळाला की, गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळते

लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे बलात्काराच्या घटना वाढत आहेतहे ममता बॅनर्जींचे म्हणणे म्हणजे सरकार आणि पोलिसांऐवजी जनतेलाच जबाबदार मानणे आहेअसाही टोला मिनाक्षी लेखी यांनी लगावलाभाजप शासीत मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये बारा वर्षा्चया मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री मीनाक्षी लेखी यांनी पीडितेला मदत करणाऱ्या आणि रुग्णालयात नेणाऱ्या आश्रमाचे आभार मानलेतसेच पीडितांबद्दल समाजाने संवेनशीलता दाखवावीअशी अपेक्षाही व्यक्त केली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news