भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले सहकुटुंब मतदान

भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले सहकुटुंब मतदान

चंद्रपूर: पुढारी वृत्तसेवा: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकित आज दुपारी एक वाजता पर्यंत 30.96 टक्के मतदान झाले. अकरा वाजेनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी सहकुटुंब हिंदी सिटी हायस्कूल केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लक्ष 37 हजार 906 मतदार आहे. यात 9 लक्ष 45 हजार 736 पुरुष मतदार, 8 लक्ष 92 हजार 122 स्त्री मतदार तर 48 इतर मतदार आहेत. आज सकाळी सात वाजता पासून मतदानाला सुरूवात झाली. सकाळी 9 वाजेपर्यंत 7.44 टक्के मतदान पार पडले. अकरा वाजेपर्यंत 18.94 टक्के मतदान पार पडले. आणि दुपारी एक वाजता 30.96 टक्के मतदान झाले.
लोकसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी सिटी हायस्कूल केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. तत्पूर्वी त्यांनी माता महाकालीचे दर्शन आशीर्वाद घेतले.

दुपारी एकपर्यंत वाजेपर्यंत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा 70-राजुरा 32.63 टक्के, 71-चंद्रपूर 28.31 टक्के, 72-बल्लारपूर 31.50 टक्के, 75-वरोरा 32.02 टक्के, 76-वणी 30.37 टक्के, 80-आर्णी 31.42 टक्के एक वाजेपर्यंत मतदान झाले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news