औरंगाबाद येथून बेपत्ता झालेली ‘बिंधास्त काव्या’ सापडली

file photo
file photo

औरंगाबाद: पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद येथील एक प्रसिद्ध अल्पवयीन यूट्युबर मुलगी शुक्रवारी (दि.९) दुपारपासून अचानक बेपत्ता झाली होती. ही मुलगी अखेर सापडली असून तिला लखनऊला जाणाऱ्या रेल्वेतून इटारसी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले, अशी माहिती तिच्या आई- वडिलांनी युट्यूबवर लाइव्ह येत दिली. अभ्यास करण्यासाठी आई- वडील ओरडल्याने ती घर सोडून लखनऊ या त्यांच्या मूळ गावी जात होती, असे त्यांनी सांगितले.

काव्या शुक्रवारी (दि.९) दुपारपासून अचानक बेपत्ता झाली होती. कुटुंबियांनी तिचा शोधा घेतला, परंतु ती कुठेही न सापडल्याने त्यांनी छावणी पोलिसांकडे धाव घेतली होती. मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

औरंगाबाद येथील पडेगाव परिसरात राहणारी अल्पवयीन तरुणी काव्या हिने अनेक दिवसांपासून 'बिंधास्त काव्या' नावावे युट्यूब चॅनेल सुरू केले होते. ती विविध विषयांवर व्हिडिओ करून, युट्यूबर टाकत होती. तिच्या व्हिडिओंना फॉलोअर्सकडून भरभरून प्रतिसाद मिळत होता. आजघडीला तिचे ४३ लाखांपेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत. दरम्यान, ही मुलगी सुखरूप सापडल्याने औरंगाबाद शहर पोलिसांना दिलासा मिळाला आहे. तर पालकांनी छावणी व सायबर पोलिसांच्या शोध मोहीमचे कौतुक करून आभार मानले आहेत.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news