अरुणाचल प्रदेशमधील मिलिट्री स्टेशन आणि रस्त्याला दिलं बिपीन रावत यांचं नाव | पुढारी

अरुणाचल प्रदेशमधील मिलिट्री स्टेशन आणि रस्त्याला दिलं बिपीन रावत यांचं नाव

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय सेनेचे पहिले डिफेन्स स्टाफ दिवंगत जनरल CDS बिपीन रावत यांना शनिवारी सन्मान दिला गेला. अरुणाचल प्रदेशमधील किबिथू येथील एका मिलिट्री स्टेशन आणि रस्त्याला बिपीन रावत यांचं नाव दिलं गेलं.सोबतर चीनसोबत असलेल्या लाईन ऑफ कंट्रोलजवळील लोहित घाटी येथील मिलिट्री स्टेशन हे बिपीन रावत यांच्या नावाने ओळखलं जाईल. याशिवाय डोंगराळ प्रदेशातील एका गावातील रस्त्यालाही रावत यांचं नाव दिलं गेलं आहे.

२०२१ मध्ये झालेल्या हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये जनरल बिपीन रावत यांचं निधन झालं होतं. रावत यांनी किबिथू येथे १९९९ ते २००० पर्यंत ५/११ गोरख रायफल्सची धुरा सांभाळली होती. शनिवारी अरुणाचल प्रदेश येथे झालेल्या कार्यक्रमात हा सन्मान दिला गेला. या कार्यक्रमात ब्रिगेडियर बीडी मिश्रा, मुख्यमंत्री पेमा खांडू, पूर्वी सेना कमांडर लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता हे उपस्थित होते. बिपीन रावत यांचं नाव असलेला हा रास्ता जवळपास २२ किमी लांब आहे. वालोंगपासून किबिथूला जोडणारा हा रास्ता आहे. या कार्यक्रमाला बिपीन रावत यांच्या मुली कृतिका आणि तारिणी देखील हजार होत्या. किबिथू सैन्य शिबिराचं नाव बदलून जनरल बिपिन रावत मिलिट्री स्टेशन ठेवलं गेलं आहे.

आठ डिसेंबरला घडली होती ती दुर्घटना……

जनरल रावत यांचा मागील वर्षी ८ डिसेंबरला तामिळनाडूमधील कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात रावत यांना प्राण गमवावे लागले होते. यावेळी त्यांची पत्नी मधुलिका आणि आणि इतर १२ सैन्य अधिकाऱ्यांचाही मृत्यु झाला होता.

 

Back to top button