कुरकुंभ: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

कुरकुंभ: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
Published on
Updated on

कुरकुंभ (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : कुरकुंभ (ता. दौंड) हद्दीत अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने भीषण अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. सुनिल पुराणे (वय ३५ रा. अग्निशमन केंद्र वसाहत कुरकुंभ, ता. दौंड) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक फरार झाला आहे.

सुनिल पुराणे हे कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन केंद्र याठिकाणी कार्यरत होते. मंगळवारी (दि. ८) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत अधिक माहितीनुसार, कुरकुंभ हद्दीतील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून रात्री सुनिल पुराणे (एमएच १४ इइ १७२७) हा दुचाकीवरून जात होता. यादरम्यान भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरात धडक दिली. हा अपघात इतका भयानक होता, कि दुचाकीस्वाराच्या शरीराच्या निम्या भागाचा अक्षरश चेंदामेंदा झाला होता. रात्री उशिरा दुचाकीस्वाराची ओळख पटली. अपघातादरम्यान दुचाकीने पेट घेतला होता. घटनास्थळी बघ्याची गर्दी झाली होती.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news