अखेर कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन चौकातील कोंडी फुटणार..! | पुढारी

अखेर कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन चौकातील कोंडी फुटणार..!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कात्रज-कोंढवा रस्त्यावर इस्कॉन (कान्हा) चौकात कासवगतीने सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामाला गती मिळणार आहे. या चौकातील वाहतूक आठ दिवस वळवून ग्रेड सेपरेटरचे काम केले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली. बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम चार वर्षांपासून सुरू असून, भूसंपादन होत नसल्यामुळे रखडले आहे. राज्य सरकारने भूसंपादनासाठी 200 कोटी रुपये देण्याचा निर्णय झाल्यानंतर आता या रस्त्याच्या कामाला गती येत आहे. एसबीआय बँक चौकापासून खडी मशिन पाोलिस चौकापर्यंत ग्रेड सेपरेटर तयार करण्यात येत आहे. या ग्रेड सेपरेटरची इस्कॉन चौकामध्ये खोदाई बाकी आहे.

या चौकातील खोदाईसाठी चौकातील वाहतूक वळवावी लागणार आहे. ही वाहतूक एक आठवडाभर वळवून चौकातील खोदाईचे काम केले जाणार आहे. वाहतूक वळविण्यासंदर्भात वाहतूक पोलिसांना पत्र देण्यात आले आहे. त्यांची परवानगी व नियोजन झाल्यानंतर चौकातील काम गतीने केले जाणार असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.

हेही वाचा :

क्रांतिदिनी मराठा समाज आरक्षणाचा पुन्हा एल्गार

नाशिक-पुणे रेल्वेच्या कामात दिरंगाई नकाे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Back to top button