बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनाही CBI ने समन्स बजावले

Land for job scam: तेजस्वी यादव : फाईल फोटो
Land for job scam: तेजस्वी यादव : फाईल फोटो
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: राष्ट्रीय जनता दलाचे नेते, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना CBI ने समन्स बजावले आहे. या समन्सच्या माध्यमातून तेजस्वी यादव यांना आज चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांना जमिनीच्या बदली नोकरी देणेप्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे. यापूर्वी ४ फेब्रुवारीला तेजस्वी यादव यांना याप्रकरणी समन्स बजावण्यात आले होते, मात्र यावेळी ते उपस्थित राहिले न्हवते. म्हणून त्यांना सीबीआयने पुन्हा एकदा समन्स बजावले आहे, अशी माहिती तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

यानंतर तेजस्वी यादव यांच्या पत्नीची प्रकृती बिघडल्याने आज ते चौकशीसाठी सीबीआयसमोर हजर राहणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तेजस्वी यादव यांच्या पत्नी गर्भवती असूनही ईडीकडून त्यांची १२ तास चौकशी करण्यात आली. यानंतर त्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास झाल्याने त्या बेशुद्ध झाल्या. त्यामुळे त्यांना तातडीने रूग्णालयात दाखस करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

याप्रकरणी काल अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रा.ज.द प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या दिल्ली आणि बिहारमधील कुटुंबीयांच्या घरांवर छापे टाकले. यामध्ये लालूंच्या तीन मुली आणि राजद नेत्यांच्या परिसराचा समावेश होता. जमिनीच्या बदल्यात नोकरी दिल्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.

ईडीने छापे टाकलेल्या लालूंच्या कुटुंबीयांच्यात लालूंच्या मुली रागिणी यादव, चंदा यादव आणि हेमा यादव यांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय जमिनीच्या बदल्यात नोकरी आणि आयआरसीटीसी प्रकरणात लालूंचे निकटवर्तीय अबू दुजानाच्या पाटणा, फुलवारी शरीफ, दिल्ली-एनसीआर, रांची आणि मुंबई परिसरात ईडीचे पथक पोहोचले असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news