Bihar cabinet expansion : नितीशकुमारांच्‍या मंत्रीमंडळात लालू पुत्र तेज प्रताप यादवांसह ‘या’ आमदारांना स्‍थान, जाणून घ्‍या सविस्तर

Bihar cabinet expansion : नितीशकुमारांच्‍या मंत्रीमंडळात लालू पुत्र तेज प्रताप यादवांसह ‘या’ आमदारांना स्‍थान, जाणून घ्‍या सविस्तर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बिहारमधील नितीशकुमार यांच्‍या नेतृत्‍वाखालील जनता दल संयुक्‍त ( जेडीयू )आणि राष्‍ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि काँग्रेस सरकारच्‍या मंत्रीमंडळाचा ( Bihar cabinet expansion )  आज विस्‍तार होत आहे. नवीन मंत्रीमंडळात लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांना संधी मिळाली आहे. अशा एकूण ३१ जणांना मंत्री पदाची शपथ घेतली आहे असून 'आरजेडींचे १६, 'जेडीयू'चे ११, काँग्रेसचे २, 'हम' आणि अपक्ष प्रत्‍येकी एकाने मंत्री पदाची शपथ घेतली आहे.

Bihar cabinet expansion : मंत्रीमंडळात 'आरजेडी'चा वरचष्‍मा

नितीश कुमार यांच्‍या मंत्रीमंडळात राष्‍ट्रीय जनता दलाच्‍या (आरजेडी)  तेज प्रताप यादव, आलोक मेहता, सुरेंद्र यादव, रामानंद यादव, ललित यादव, कुमार सर्वजीत, विेजेंद्र यादव, चंद्रशेखर यादव, समीर महासेठ, अनिता देवी, जितेंद्र राय, सुधाकर सिंह, इसराइल मंसुरी, कार्तिक सिंह, शाहनवाज आलम, भरत भूषण मंडल यांना स्‍थान मिळाले आहे.

जेडीयूला ११ मंत्रीपदे

जनता दल संयुक्‍तच्‍या ( जेडीयू ) :  विजय कुमार चौधरी, श्रवण कुमार, अशोक चौधरी, लेसी सिंह, सुरेंद्र राम, जमा खान, संजय झा, मदन साहनी, शीला मंडल, सुनील कुमार, जयंत राज यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

काँग्रेससह हम आणि अपक्षांनाही संधी

काँग्रेसचे आफाक आलम आणि मुरारी प्रसाद गौतम यांनी शपथ घेतली. हिंदुस्‍तानी अवाम मार्चा पक्षाचे संस्‍थापक व माजी मुख्‍यमंत्री जीतन राम मांझी यांचे पुत्र संतोष सुमन यांनाही संधी मिळेली असून, नितीश कुमार यांचे निकटवर्ती अपक्ष आमदार सुमित कुमार सिंह यांनाही मंत्रीमंडळात स्‍थान मिळाले आहे.

लवकरच होणार खातेवापट : नितीशकुमार

बिहार मंत्रीमंडळाचा आज विस्‍तार झाला आहे. आता लवकर खाते वाटपही होईल, अशी माहिती मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांनी दिली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news