बोअरवेलमध्‍ये पडलेल्‍या चिमुकल्‍याची आठ तासांच्‍या अथक परिश्रमानंतर सुखरुप सुटका

बोअरवेलमध्‍ये पडलेल्‍या चिमुकल्‍याची आठ तासांच्‍या अथक परिश्रमानंतर सुखरुप सुटका

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बिहारमधील नालंदामध्ये बोअरवेलमध्‍ये पडलेल्‍या तीन वर्षांच्या चिमुकल्‍याची 'एनडीआरएफ'च्या टीमने 8 तासांच्या अथक परिश्रमानंतर आज ( दि.२३)  सायंकाळी सुखरुप बाहेर काढले आहे. त्‍याला तत्‍काळ रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे.

बिहारच्या नालंदा येथील कुल गावात शिवमची आई शेतात काम करत होती. शिवम हा तिथेच जवळपास खेळत असताना त्याचा अचानाक पाय घसरला आणि तो 40 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला. माहिती मिळताच एनडीआरएफ आणि इतर बचाव पथकांकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले. मुलाला ऑक्सिजन पोहोचवण्यसााठी आणि बोअरवेलमधून मुलाला बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीन मागवण्यात आल्या. तसेच वैद्यकीय मदत देण्यासाठी ऑक्सिजन सुविधांनी सुसज्ज वैद्यकीय पथके देखील घटनास्‍थळी दाखल झाले.

परिसरातील एका शेतकऱ्याने बोरिंगसाठी इथे बोअरवेल खोदले होते. मात्र, इथे पाणी लागले नाही. त्यामुळे अन्यत्र बोअरवेल खोदण्याचा त्याने निर्णय घेतला. मात्र या ठिकाणी खोदलेली बोअरवेल बंद करण्यात आली नव्हती. परिणामी ही घटना घडली होती.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news