Bigg Boss Marathi Grand Finale : चौथ्या सीझनचा कोण होणार महाविजेता?

big boss marathi - 4
big boss marathi - 4

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठी म्हंटलं की, आपल्या सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहचते. मग पर्व कधी सुरु होणार? सदस्य कोण असणार? सिझनच घर कसं असेल? आणि बरंच काही…आता संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत आहे ते म्हणजे या पर्वाचा महाविजेता कोण ठरणार याची. अखेर तो क्षण आला. १०० दिवसांपूर्वी १६ सदस्यांसोबत या रोमांचक प्रवासाची सुरुवात झाली आणि आता घरात उरले आहे टॉप ६ सदस्य.  (Bigg Boss Marathi Grand Finale) यामध्ये महाराष्ट्राला मोठं सरप्राईझ मिळालंय. कारण, ज्या स्पर्धकाची वाट आपण सगळे बघत होतो त्या स्पर्धकाची एंट्री झाली आणि घरात त्या सदस्याने धुमाकूळ घातला. ती सदस्य म्हणजे राखी सावंत. (Bigg Boss Marathi Grand Finale)

सदस्य अगणिक टास्क आणि अडचणींना सामोरे गेले. कधी कधी घरच्यांच्या आठवणीने डोळे पाणावले तर कधी सदस्य घराबाहेर गेला ही गोष्ट मनाला चटका लावून गेली. हे घर अशा अनेक क्षणांचे साक्षीदार राहिले आहे. आता हेच घर निरोप घेण्याच्या वाटेवर आहे. कारण, आता हा प्रवास येत्या रविवारी संपणार असला तरीदेखील हे नातं मात्र अधिक दृढ झाले आहे यात शंका नाही. बिग बॉस मराठी सीझन ४ देखील महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचला आणि कानाकोपर्‍यात फक्त याच कार्यक्रमाची चर्चा सुरू झाली. आता या TOP ६ मधून कोणता सदस्य ठरणार बिग बॉस मराठी सिझन ४ चा महाविजेता हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. बिग बॉस मराठी सीझन चौथाचा Grand Finale ८ जानेवारी रोजी संध्या ७.०० वा. कलर्स मराठीवर पार पडणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घराला यावर्षी कधी अपूर्वाच्या आवाजाने तर कधी अमृताच्या रडण्याने हलवून सोडलं. कधी अक्षयची स्ट्रॅटेजी तर कधी राखीचे राडे आणि फुल ऑन एंटरटेनमेंटने हे घर सतत चर्चेत राहिले. कधी हे घर विकास आणि अपूर्वाच्या लुटुपुटुच्या भांडणांचे साक्षिदार राहिले तर कधी घरात घडलेल्या प्रत्येक लहान मोठ्या घटनांचे. कधी सदस्यांसोबत हे घर खूप हसलं तर कधी त्याला देखील अश्रू अनावर झाले. या घराने सदस्याचे प्रत्येक रूप पहिले. मायाळू, खोडकर, भांडखोर, संवदेनशील, कारस्थानी… या भिंती आणि या घरातील प्रत्येक वस्तू याचे साक्षीदार असतील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news