पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो 'बिग बॉस-१६' (Bigg Boss 16) आता फिनालेकडे वळला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या शोचा फिनाले आयोजित केला जाईल. 'वीकेंड का वार'मध्ये शोमधून तीन कंटेस्टेंट्स अब्दु रोजिक, साजिद खान आणि श्रीजिता डे बाहेर झाले आहेत. आता शोमध्ये केवळ टॉप ९ सदस्य उरले आहेत. यापैकी चार जण टास्कमध्ये नॉमिनेट झाले आहेत. या आठवड्यात त्यांच्यावर एविक्शनची तलवार लटकणार आहे. या आठवड्यात जे चार सदस्य नॉमिनेट झाले आहेत, त्यांची नावे समोर आली आहेत. याशिवाय निर्मात्यांनी फिनालेपर्यंत एविक्शनचा प्लॅन केला आहे, हे देखील उघड झाले आहे. (Bigg Boss 16)
या शोचा होस्ट सलमान खान आता 'वीकेंड के वार'मध्ये दिसणार नाही. सलमान खान शो सोडत असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, या आठवड्यात सुम्बुल तौकीर खान, टीना दत्ता, शालीन भनोट आणि सौंदर्या शर्मा नॉमिनेट झाले आहेत. पुढील आठवड्यात सौंदर्या शर्माचा प्रवास या शोतून संपणार आहे.
आता बिग बॉस १६ ची फिनालेची तारीख जवळ येत आहे. अशात एविक्शनदेखील महत्त्वाचं ठरलं आहे. बिग बॉसच्या फायनल राऊंडमध्ये सहा स्पर्धक असतील. पुढे येणाऱ्या ४ आठवड्यांमध्ये ३ आणि एविक्शन होईल. फिनाले वीकमध्ये एक मिड एविक्शन होईल.
मीडिया रिपोर्टनुसार, बिग बॉस १६ शो सलमान खान होस्ट करत आहे. पण येणाऱ्या आठवड्यात 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानच्या जागी करण जोहर शो होस्ट करेल, अशी माहिती समोर आली होती. पण आता लेटेस्ट रिपोर्टनुसार, येणाऱ्या 'वीकेंड के वार'ला सलमान वा करण जोहर नाही तर साजिद खानची बहिण फराह खान हा शो होस्ट करेल.