मोठी बातमी : ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण देवकातेंना अटक

मोठी बातमी : ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण देवकातेंना अटक

पुणे : ललित पाटील ड्रग प्रकरणात ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना आज अटक करण्यात आली आहे. ड्रग तस्कर ललित पाटील पलायन प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. ललित पाटील प्रकरणात दोषी आढळून आलेल्या ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांना पदमुक्त केल्यानंतर त्यांच्या विभागीय चौकशीचे तर आर्थोपेडीक सर्जन असलेले डॉक्टर प्रविण देवकाते यांच निलंबन करण्यात आले होते.

ड्रग तस्कर ललित पाटीलला मदत केल्याचा ज्यांचावर आरोप होत होता ते ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चार सदस्यीय वैद्यकीय समितीनं दोषी ठरवले आहे. या समितीच्या अहवालानुसार ललित पाटीलचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढावा यासाठी त्याला डॉक्टर ठाकूर यांची नेहमीच मदत होत होती. तसेच डॉक्टर ठाकूर यांच्या सांगण्यावरून डॉक्टर प्रवीण देवकाते हे ललित पाटील आजारी असल्याचे खोटे रिपोर्ट तयार करत होते.

ललित पाटील प्रकरणी आता येरवडा कारागृह प्रशासनही संशयाच्या भोवऱ्यात आहे. कारागृहातील समुपदेशक आणि वैद्यकीय अधिकारी हे दोघेही अटकेत आहेत. सुधाकर इंगळे मार्फत डॉ. संजय मरसळे यांना पैसे गेले होते. सुधाकर इंगळे आणि डॉ संजय मरसळे या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.

 16 जणांची चौकशी

ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांकडून आत्तापर्यंत ससून रुग्णालयातील 16 जणांची चौकशी करण्यात आली होती. ससून रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि इतर स्टाफची याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. ललित पाटील हा ससून रुग्णालयातील 16 नंबर वॉर्ड मध्ये दाखल होता. या वार्डमध्ये कार्यरत असणाऱ्या इतर स्टाफची सुद्धा पोलिसांनी कसून चौकशी केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news