विमानासारखी दिसणारी पर्स! | पुढारी

विमानासारखी दिसणारी पर्स!

न्यूयॉर्क : जगभरात असे अनेक ब्रँड आहेत, जे केवळ त्यांच्या नावावर अनेक वस्तू बाजारात आणतात आणि खपवतात सुद्धा. आता ब्रँडेड वस्तूंचा शौक अनेकांना असतो. पण, यापोटी कोण किती महागडी वस्तू खरेदी करेल, याचा काहीच नेम नसतो. असाच एक अनुभव लुईस व्हिटॉन या ब्रँडने प्रत्ययास आणून दिला आहे. या कंपनीने चक्क विमानाच्या आकाराची बॅग वजा पर्स बाजारात उतरवली आहे. मात्र, या बॅगची किंमत मात्र अगदीच अव्वाच्या सव्वा आहे.

एका बॅगच्या किमतीत वन बीएचके फ्लॅट येऊ शकेल, अशी परिस्थिती यामुळे निर्माण झाली आहे. या कंपनीने विमानाच्या आकारातील एका बॅगसाठी थोडीथोडकी नव्हे तर चक्क 32 लाख 45 हजार रुपये इतकी निश्चित केली आहे.

लुईस व्हिटॉन या कंपनीचे बॅग्ज, पर्स जवळपास सर्व सेलिब्रिटी वापरतात. क्लासी लूक हे या कंपनीचे ठळक वशिष्ट्य ठरत आले आहे. आता मात्र या कंपनीने जी बॅग लाँच केली, ती थक्क करणारी आहे. या बॅगेचे डिझाईन एखाद्या विमानाप्रमाणे आहे. काही युजर्सनी मात्र या नव्या बॅगेवर बरेच ताशेरे ओढले. आपल्या पोस्टमध्ये तो म्हणाला, ‘ही बॅग एखादा पायलटही खरेदी करणार नाही’!

Back to top button