Mahesh Babu-Prabhas:2 स्टार्सचा मुकाबला; प्रभास-महेश बाबूची होणार टक्कर

mahesh babu-prabhas
mahesh babu-prabhas
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉक्स ऑफिसवर पुढील वर्षी महामुकाबला होणार आहे. जेव्हा साऊथचे दोन सुपरस्टार बॉक्स ऑफिसवर टक्कर देतील. महेश बाबूचा चित्रपट एसएसएमबी २८ ची नवी रिलीज डेट समोर आलीय.  (Mahesh Babu-Prabhas) महेश बाबूने जेव्हापासून आपल्या चित्रपटाच्या नव्या रिलीज डेटची घोषणा केलीय सगळीकडे गोंधळ उडालाय. महेश बाबूने ट्विट केलं आहे की, त्याचा पुढील चित्रपट १३ जानेवारी चित्रपटगृहात रिलीज होईल. महेश बाबूचा चित्रपट पाहण्यासाठी फॅन्स अद्यापही खूप उत्सुक आहेत. निर्मात्यांनी हा चित्रपट पुढील वर्षी मकर संक्रांतीच्या औचित्याने रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. (Mahesh Babu-Prabhas)

महेश बाबूच्या या घोषणेनंतर एक गोष्ट स्पष्ट झालीय की, पुढील वर्षी मकर संक्रांतीच्या औचित्याने त्याची टक्कर प्रभासशी होईल. प्रभासने आधी घोषणा केलीय की, त्याचा आगामी चित्रपट प्रोजेक्ट के १२ जानेवारी रिलीज होईल. या चित्रपटामध्ये प्रभाससोबत अमिताभ बच्चन – दीपिका पादुकोणदेखील मुख्य भूमिकेत असतील. प्रभास सध्या चित्रपट 'प्रोजेक्ट के'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

प्रभासचा प्रोजेक्ट के आणि महेश बाबूचा एसएसएमबी २८, दोन्हीही चित्रपटांची प्रतीक्षा फॅन्स करत आहेत. दोन्हीही चित्रपटांचे क्लॅश पाहायला मिळतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news