Chechen force : झेलेन्स्कींच्या हत्येसाठी पाठवलेल्या चेचेन फोर्सचा खात्मा

Chechen force : झेलेन्स्कींच्या हत्येसाठी पाठवलेल्या चेचेन फोर्सचा खात्मा

पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेनने रशियाला जबरदस्त धक्का दिला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या हत्येसाठी बर्बर चेचेन स्पेशल फोर्सची (Chechen force) मोठी तुकडी पाठवलेली होती. मात्र, युक्रेनने या संपूर्ण फोर्सचाच खात्मा केला आहे, असं वृत्त डेली मेलने दिलं आहे.

बर्बर चेचेन स्पेशल फोर्सची (Chechen force) तुकडी ही खूप क्रूर आणि हिंसाचारी आहे. त्याचबरोबर मानवी हक्कांच्या उल्लंघनासाठी कुप्रसिद्ध आहे. कीव्हच्या ईशान्यकडील हाॅस्टोमेलजवळ त्याच्या ५६ रणगाड्यांचा ताफा युक्रेनच्या क्षेपणास्त्राने उडविण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. असे असले तरी या फोर्समधील किती सैनिक मारले गेले, याची माहिती समोर आलेली नाही.

परंतु संख्या शेकडोंमध्ये असण्याची शक्यता आहे. युक्रेनच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये चेचेन जनरल मॅगोमेद तुशैव यांचंही नाव असल्याचे समोर आलेले आहे. तुशैवला फोटोमध्ये कादिरोवसोबत दाखविण्यात आलं होतं. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण, कादिरोव समलिंगी पुरुषांचा छळ करून त्यांना मारण्याच्या कामात प्रसिद्ध आहे. कादिरोवने त्याच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी युक्रेनियच्या जंगलात स्क्वाड्रनला भेट दिली होती, असं सांगितलं जातं.

त्यामुळे युक्रेनच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात या फोर्सचे लोक मारलं जाणं, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासाठी खूप मोठा धक्का आहे.  कारण, युक्रेनचा पराभूत करण्याच्या योजनेचा मोठा भाग हा फोर्स आहे. त्यांचाच खात्मा होणं, रशियासाठी धक्काच मानला जातोय.

डेली मेलच्या वृत्तानुसार पुतीन यांनी यु्क्रेनच्या राष्ट्रपतींना म्हणजेच वोलोडिमिर झेलेन्सी यांना पकडण्यासाठी किंवा त्यांचा जीवे मारण्यासाठी बर्बर चेचेन स्पेशल फोर्सची तुकडी पाठवली होती. यामुळे युक्रेनला प्रचंड भीती वाटेल, असा अंदाज होता. चेचेनचे जवान हे 'हंटर्स' म्हणून ओळखले जातात. मात्र, वेळेपूर्वीच त्यांचा खात्मा झाला असल्याचे वृत्त समोर आले आहे.

पहा व्हिडिओ : युक्रेन एकाकी | Pudhari Podcast

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news