Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेच्या सांगता कार्यक्रमात २१ राजकीय पक्षांना आमंत्रण; तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्षासह ९ पक्ष येणार नाहीत

Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढारी ऑनलाईन डेस्क : चर्चेत असणारी भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra ) सांगता कार्यक्रमात १२ समविचारी राजकीय पक्ष सामील होणार आहेत. ३० जानेवारीला हा कार्यक्रम होईल. तर २१ पक्षांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहेत. परंतु काही पक्ष सुरक्षेच्या कारणास्तव या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. असं सांगण्यात आले आहे. तर तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष,  टीडीपी यांच्यासह ९ पक्ष या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. वाचा सविस्तर बातमी.

हे पक्ष सहभागी होणार 

भारत जोडो यात्रेची उद्या सांगता होणार आहे. या कार्यक्रमात द्रविड मुनेत्र कळघम (DMK), राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष (NCP), राष्ट्रीय जनता दल (RJD), जनता दल (संयुक्त), शिवसेना, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) CPI(M), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI),  विदुथलाई चिरुथाईगल काची (VCK), केरळ कॉंग्रेस, जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी), झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) हे समविचारी पक्ष श्रीनगरमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जून खर्गे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहित म्हंटलं आहे की, ३० जानेवारीला श्रीनगर येथे होणाऱ्या भारत जोडो यात्रा कार्यक्रमात मोठ्या संख्येने लोक सामिल होतील. काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते आणि इतर राजकीय पक्षांचे नेतेही या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. तुम्ही या प्रकरणी वैयक्तिकरित्या हस्तक्षेप करून संबंधित अधिकाऱ्यांना ३० जानेवारीला श्रीनगर येथे होणाऱ्या यात्रा आणि समारंभाच्या समाप्तीपर्यंत पुरेशी सुरक्षा पुरवण्याचा सल्ला दिलात तर मी आभारी आहे."

Bharat Jodo Yatra : १४५ दिवसांत ३,९७० किमी

कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा 7 सप्टेंबर रोजी देशाच्या दक्षिणेकडील टोकापासून सुरू झाली. सुमारे 145 दिवसांत 3,970 किमी, 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा प्रवास केल्यानंतर 30 जानेवारी रोजी श्रीनगर येथे ही यात्रा संपेल. या १२ राज्यांमध्ये तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब राज्यामध्ये गेली आहे. सध्या काश्मीरमध्ये पदयात्रा सुरु आहे.
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news