Bengaluru Rameshwaram Cafe Blast | रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरण: NIA कडून नागरिकांना मदतीचे आवाहन

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन डेस्क: बंगळूरमधील राजाजीनगर येथील रामेश्वरम कॅफेमध्ये दि.१ मार्चला) मोठा स्फोट झाला हाेता. यामध्ये ४ जण गंभीर जखमी झाले हाेते. या प्रकरणाचा तपास 'एनआयए'कडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान, तपास यंत्रणेने संशयित आरोपीचे काही फोटो शेअर करत, नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. या संदर्भातील माहिती NIA ने त्यांच्या एक्स अकाऊंटवरून दिली आहे. (Bengaluru Rameshwaram Cafe Blast)

राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित संशयिताची ओळख पटवण्यासाठी NIA नागरिकांचे सहकार्य घेत आहे. यासाठी नागरिकांनी 08029510900, 8904241100 वर कॉल करा किंवा कोणत्याही माहितीसह info.blr.nia@gov.in वर ईमेल करा. तुमची ओळख गोपनीय राहील." असे तपास यंत्रणेनेने केलेल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. (Bengaluru Rameshwaram Cafe Blast)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news